विसापूर येथील हनुमान मुर्तीच्‍या तोडफोड प्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पोलिस अधिक्षकांना चौकशीचे निर्देश.*

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

बल्‍लारपूर तालुक्‍यातील विसापूर गावानजिक भिवकुंड नाल्‍याजवळ श्री हनुमान मुर्तीची काही समाज कंटकांनी तोडफोड केल्‍याप्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस अधिक्षकांना सदर प्रकरणाची चौकशी करत दोषींवर कडक कारवाई करण्‍याचे निर्देश दिले आहेत.

विसापूर गावानजिक भिवकुंड नाल्‍याजवळ काही समाजकंटकांनी श्री हनुमान मुर्तीची विटंबना व तोडफोड केल्‍यामुळे विसापूर येथील गावामध्‍ये असंतोष निर्माण झाला आहे. धार्मीक भावना दुखावल्‍याने नागरिक संतप्‍त झाले आहे. परिस्‍थीती चिघळू नये यादृष्‍टीने तातडीने पोलिस प्रशासनाने हस्‍तक्षेप करून परिस्‍थीती आटोक्‍यात आणावी व चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस अधिक्षकांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here