By : Rajendra Mardane
वरोरा :
- *ख्यातनाम नेत्र शल्यविशारद पद्मश्री डॉ तात्याराव लहाने व डॉ रागिनी पारेख यांची उपस्थिती*
वरोरा : जे जे हॉस्पिटल, मुंबई; व्हिजन प्लस, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टीक्षीणता कार्यक्रम आणि महारोगी सेवा समिती, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदवन, वरोरा येथे २४ ते २६ ऑक्टोंबर पर्यंत विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
आनंदवनात मागील अनेक वर्षांपासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येत होते. त्यात हजारों नेत्र रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया ही करण्यात आली. कोरोनामुळे काही काळासाठी शिबिर स्थगित झाले. तद्नंतर जवळपास ३/४ वर्षांनंतर आनंदवनात पुनश्च ख्यातनाम नेत्र शल्यविशारद पद्मश्री डॉ तात्याराव लहाने व डॉ रागिनी पारेख यांच्या प्रमुख उपस्थित शिबीर होत आहे. त्यामुळे नेत्र रुग्णांमध्ये शिबिराबद्द्ल उत्सुकता आहे.
गुरुवार दि.२४ ऑक्टोंबरला सकाळी प्रमुख अतिथिच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन, सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत आनंदवनातील मुख्यमंत्री सभागृहात नेत्र तपासणी, दि. २५ व २६ ऑक्टोंबरला शस्त्रक्रिया करण्यात येईल. परिसरातील गरजू लाभार्थ्यांनी सदर मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
*शिबिरात शस्त्रक्रिया करण्यात येणाऱ्या रुग्णांसाठी विनामूल्य निवास,भोजन आणि औषधी सुविधा उपलब्ध आहे, रुग्णांनी स्वतःचे ताट, वाटी व पांघरूण आणणे आवश्यक आहे. नेत्र तपासणी २४ ऑक्टोबरला सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत चालू राहील, त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी रुग्णांनी येतेवेळी जेवन करून यावे.*
- *डॉ. विजय पोळ*,
*वैद्यकीय अधिकारी, सीतारमण लेप्रसी हॉस्पिटल, आनंदवन*