लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 23 नोव्हेंबर 2022कु. रुद्राक्षी मनोहर टेमकर हिचे मु. नवीन कमळपाडा, पो.शहाबाज, ता. अलिबाग हे मुळ गाव असून रुद्राक्षी आर .के.एफ. जे.एन.पी. विद्यालय, शेवा. टाऊनशिप उरण या ठिकाणी इयत्ता सातवी इंग्रजी माध्यम मध्ये शिक्षण घेत आहे.तिचं आताच वय 12 वर्ष असून हिने काल मंगळवार दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजी श्री दुर्गामाता कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ विजयदुर्ग, तसेच जे. आय. एम. स्विमिंग अकॅडमी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील दुसरी ओपन वॉटर मॅरेथॉन स्पर्धेत 30 किलोमीटर अंतर लहान वयात पूर्ण करून पाचवा क्रमांक संपादन केलेला आहे. देशभरातील आलेल्या स्पर्धकांमधून कमी वयाची मुलगी होण्याचं मान देखील तिने मिळवलेला आहे .30 किलोमीटर हे अंतर रुद्राक्षीने 7 तास 12 मिनिटे 57 सेकंदात पूर्ण करून आपलं नावलौकिक उंचावलेला आहे. त्याचबरोबर उरण ,अलिबाग आणि रायगड जिल्ह्याचे नाव देखील राष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलेला आहे. या कारणास्तव तिचं जिल्हाभरातून कौतुक होत आहे. विद्यालयात देखील भरभरून कौतुक होत आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे ( इंग्रजी माध्यम), गिरीश पाटील( मराठी माध्यम), मुख्याध्यापक तसेच मराठी माध्यमाचे पर्यवेक्षक शशिकांत म्हात्रे, इंग्रजी माध्यमाचे ज्येष्ठ शिक्षक जगदीश मढवी,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक रमाकांत गावंड तसेच विद्यालयाच्या प्रिन्सिपल पूजा अंजनीकर तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी रुद्राक्षीचे या यशाबद्दल तिला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत. रुद्राक्षी चे मार्गदर्शक किशोर पाटील तसेच प्रशिक्षक हितेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली रुद्राक्षी उरण नगरपालिका उरण जलतरण तलावात प्रशिक्षण घेत आहे. व्यवस्थापक श्रीकांत जाधव व सर्व क्रीडाप्रेमी सहकारी यांनी ही शुभेच्छा दिल्या आहेत.