लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर
मंगळवार, दि. २२ नोव्हेंबर
भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांचा वाढदिवस काल जिल्हाभर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्तानं लोकनेते, विकासपुरुष ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शक सेवापद्धतीला साजेसे असे जनसेवेचे विविध कार्यक्रम जिल्हाभर घेण्यात आले.
यामध्ये चौदा ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांमध्ये तब्बल २७५९ रक्तदात्यांनी रक्तदान करून महादान दिलं. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने रक्तदान करून रक्तदात्यांनी चंद्रपूर जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा रक्तदानाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
देवराव दादा भोंगळे मित्रपरिवारातर्फे शासकीय रक्तपेढी चंद्रपूर तथा डॉ. हेडगेवार रक्तपेढी नागपूर यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील घुग्घुस, वरोरा, चंदनखेडा, भद्रावती, बंगाली कॅम्प(चंद्रपूर), इंदिरानगर (चंद्रपूर), बल्लारपूर, बिबी, कोरपना, राजुरा, जिवती, गोंडपिपरी, तोहोगाव, चिंतलधाबा येथे या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये अठरा वर्षांपासुन रक्तदानाची अखंडित परंपरा चालवणार्या घुग्घुस शहरात सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या शिबीराचा शेवट रात्री नऊ वाजता शेवटच्या १३४७ व्या रक्तदात्याकडून झालेल्या रक्तदानाने झाला. यासह वरोरा येथे १००, चंदनखेडा येथे ७७, भद्रावती येथे ५१, बंगाली कॅम्प(चंद्रपूर) येथे ५४, इंदिरानगर ६३ (चंद्रपूर), बल्लारपूर येथे १०५, बिबी येथे ८८, कोरपना येथे ११४, जिवती येथे ७१, राजुरा येथे ३३३, गोंडपिपरी येथे १५०, तोहोगाव येथे ७६ आणि चिंतलधाबा येथे १३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
राजूऱ्यात विविध पक्षसंघटनांच्या तसेच अराजकीय भाच्यांनी ‘लाडक्या देवराव मामासाठी’ पुन्हा एकदा एकत्र येऊन तब्बल ३३३ रक्तदात्यांचा आकडा गाठला. मागील वर्षी सुद्धा वाढदिवसानिमित्त १७५३ रक्तदात्यांनी रक्तदान करून देशसेवा केली होती.
चंद्रपूर शहरात माजी उपमहापौर राहुल पावडे मित्रपरिवारातर्फे युवा व्याख्याते सोपान कनेरकर यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती पहायला मिळाली.
यासोबतच जिल्ह्यात रोग निदान शिबीर, महाआरती व रुद्राभिषेक, भोजनदान, वाचनालयाला स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाटप, दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत सहभोजन,
विद्यार्थ्यांना नोटबुक व गरजूंना ब्लँकेटचे वितरण, रुग्णांना फटवाटप आणि चिंतलधाबा येथे नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना, माझ्या वाढदिवसाच्या निमित्याने जिल्हाभर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच मित्रपरिवाराने असे महारक्तदानाचे व जनसेवेचे कार्यक्रम राबवून आजचा दिवस सेवामय केला त्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी महारक्तदान पार पडले. कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या छोट्याश्या कार्यकर्त्याला शुभेच्छाभेट द्यावी म्हणून विविध सेवाभावी कार्यक्रमं घेतली, मोठ्या संख्येने रक्तदान शिबीरं पार पडले. यासोबतच माझ्या निरोगी दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली त्याबद्दल मला सदैव तुमच्या ऋणात रहायला आवडेल. असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.