कोरपना येथे श्री देवरावभाऊ भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष यांचा वाढदिवस उत्साहात केक कापून साजरा ♦️ एकशे चौदा रक्तदात्यांनी केले रक्तदान


लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना – देवराव दादा भोंगळे जिल्हाध्यक्ष यांचा वाढदिवस भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने उत्साहात केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी भव्य रक्तदान शिबिर सोमवार दिनांक २१ ला कोरपना येथील शांताराम देरकर यांच्या घरासमोर राजीव गांधी चौक परिसरात घेण्यात आले. यात एकशे चौदा रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,
जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले,
भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर,सौ अर्चनाताई भोंगळे ,
उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोंगळे, सतीश उपलंचीवार शहर अध्यक्ष गडचांदुर,शिवाजी सेलोकर, किशोर बावणे,निलेश ताजने, आशिष ताजने युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष,अमोल आसेकर माझी नगरसेवक,ओम पवार,अरुण मडावी,विजय रणदिवे,दिनेश खडसे,सुनील देरकर ,शशिकांत आडकिने , हरिभाऊ घोरे,अभय डोहे, रामसेवक मोरे,जगदीश पिंपळकर,संदीप टोगे,नारायण कोल्हे ,विजय पानघाटे,सत्यवान घोटेकर,नगरसेविका वर्षा लांडगे, सुभाष हरबडे,गीता डोहे,सविता तुमराम ,पवन मोहितकर,
प्रमोद पायगण,दिलीप पावडे, नदीम सय्यद,यशवंत इंगळे,पवन बूरेवार, दिनेश ढेगळे, प्रमोद कोडापे,पद्माकर धगडी,सागर दुर्वे आदी उपस्थित होते.यावेळी देवराव भाऊ भोंगळे यांनी आपल्या भाषणात भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरिकांनी दाखवलेले प्रेम हे कधीच विसरू शकणार नाही व माझ्या वाढदिवसाला 114 रक्त दात्यांनी रक्त दान केले या सर्व रक्त दात्यांचे आभार मानतो असे मनोगत व्यक्त केले या रक्तदान शिबिराला डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी नागपूर च्या डॉ. हर्षा सोनी व चमुनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमा ला भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी केले तर आभार पुरुषोत्तम भोंगळे यांनी मानले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *