लोकदर्शन पुणे👉राहुल खरात
बॉलिवुडशी संबंधित जाहिरात प्रसिद्धी स्टुडिओत ध्वनिमुद्रक म्हणून सुरवात करुन मग… संकलक, सहाय्यक दिग्दर्शक, दिग्दर्शक, लेखक, मॉडेल आर्टिस्ट समन्वयक, संपर्क अधिकारी, इव्हेंट मॅनेजर, संगीतकार, कॅमेरामन, असे एक एक विभागात यश मिळवत गेले, या दरम्यान ९० च्या दशकातील जवळपास सर्वच सुपरहिट हिंदी चित्रपट त्यांनी केले होते … ज्यात मुख्यत्वे करुन *मैने प्यार किया , तेजाब , ईश्वर , राम लखन , खलनायक, हम आप के है कौन , दिल , बेटा , घायल , क्रांतिवीर , तिरंगा , गझनी , शोला और शबनम असे अनेक चित्रपट आहेत . गेली दहा वर्षे ते साहित्य क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत होते… आणि गेले वर्षभर *मराठी साहित्य मंडळ विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष* म्हणून कार्यरत आहेत बॉलिवुड मधील *२८ वर्षाच्या काळात दिलीप कुमार, देव आनंद, राज कपूर पासून ते काल परवाच्या टायगर श्रॉफ, आलिया भट पर्यंत जवळपास चार ते पाच पिढ्यांतील अगणित व्यक्तींसोबत काम करत कित्येक पारितोषिक विजेते ठरले . अशा अभूतपूर्व यश प्राप्त करणाऱ्या अवलीयाला आता *सावित्रीबाई फुले या कला साहित्यातील सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्काराने* …*दिनांक २७ नोव्हेंबर रोजी* वर्धा येथे होणाऱ्या मराठी साहित्य मंडळाच्या राज्य स्तरीय कवी संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे .