लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर ÷सावित्रीबाई फुले विद्यालयातील वर्ग ५ वी ते ८ विच्या विद्यार्थ्यांना शिक्षिका भुवनेश्वरी गोपमवार यांच्या नेतृत्वाखाली *शैक्षणिक उपक्रम* या अंतर्गत शिक्षणावर आधारित पल्याड चित्रपट बघण्याची संधी उपलब्ध करून दिली. चित्रपटातील बालकलाकार *शंभू* शिक्षण घेण्यासाठी करीत असलेला संघर्ष पाहून अनेक विद्यार्थ्यांन मध्ये जिद्द व प्रेरणा निर्माण होईल….!त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतीक्रिया घेण्यात आल्या. त्यात विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने शिक्षणाचे महत्व कथन केले. जवळपास १५० विद्यार्थ्यांनी हा चित्रपट बघण्याचा आनंद घेतला. चित्रपट उत्कृष्ट असल्याचे मत शाळेतील शिक्षिका भुनेश्वरी गोपमवार/ धर्मपुरीवार यांनी प्राचार्य काळे सर यांचे जवळ व्यक्त करताच त्यांनी कार्यालयीन बाबी पूर्ण करून विद्यार्थ्यांना चित्रपट बघण्यास नेण्याची परवानगी दिली. तसेच सहाय्यक शिक्षक सि.एम.किन्नाके , मरस्कोल्हे सर, जिवन आडे सर ,आत्राम सर यांच्या सहकार्याने चित्रपट बघण्याचा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी झाला. किन्नाके सर यांनी अश्या प्रकारचे चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविल्यास आपण अंधश्रद्धेचे निर्मूलन करून विद्यार्थ्यांना विज्ञान युगाकडे नेऊ शकतो असा आशावाद व्यक्त केला. सर्वांनी चित्रपट बघण्याचा आनंद घ्यावा व ग्रामीण कलाकारांना प्रोत्साहित करावे. मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी त्यांचे आभार मानले.