लोकदर्शन 👉 प्रतिनिधि
औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या नांदा ग्रामपंचायतची काही दिवसापूर्वीच सार्वत्रिक निवडणूक पार पडली येथे दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी पहिल्या आमसभेचे आयोजन केले होते सभेला येत असलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यावरून झालेल्या वादात नांदा ग्रामपंचायतच्या एका सदस्यानेच चांगलाच राडा करत तुफान हाणामारी केली भवनातील खुर्च्यांची फेकाफेक झाली सभेतील काही नागरिकांनीही गदारोळ करणाऱ्याला चांगलाच चोप दिला आम सभेत झालेल्या हाणामारीमुळे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भयभीत झाल्या वेळीच पोलीस दाखल झाल्याने वातावरण शांत झाले व आमसभा पार पडली ग्रामपंचायत सदस्याच्या अशोभनीय कृत्यामुळे गावातील नागरिक मोठा संताप व्यक्त करत होते या प्रकरणात गडचांदूर पोलिसांनी मनसे नेत्यांसह सात जणांवर अदखलपात्र गुन्हे नोंदविले असून पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे
सविस्तर वृत्त असे की दिनांक 17 नोव्हेंबर रोजी 11 वाजता सांस्कृतिक भवन नांदाफाटा येथे आमसभेचे आयोजन केले होते सरपंच मेघा पेंदोर यांच्या अध्यक्षतेत सभेचे कामकाज सुरू झाले तंटामुक्ती अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेचे काम सुरू होते 12 वाजताचे सुमारास सांस्कृतिक भवनाचे गेट बंद करण्यात आले गेट बंद झाल्यानंतर काही नागरिकांना प्रवेश देण्यात आला नागरिक येत असताना मध्येच एका ग्रामपंचायत सदस्याने सांस्कृतिक भवनाचे गेट परत बंद केले यामुळे नागरिक व ग्रामपंचायत सदस्यात वादावाद झाला अशातच ग्रामपंचायत सदस्याने एका नागरिकाची कॉलर पकडून धक्का दिला यामुळे आमसभेत तुंबळ हाणामारी झाली खुर्च्यांची फेकाफेक झाली नागरिकांनी या ग्रामपंचायत सदस्यासह त्याच्या मुलालाही धु धु धुतले आमसभेत हाणामारी सुरू असल्याने काही नागरिकांनी पोलिसांना बोलावून घेतले पोलीस पोहोचताच वातावरण शांत झाले यानंतर भास्कर लोहबळे यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदावर निवड झाली आमसभेचे कामकाज पार पडले गैरवर्तन करून हाणामारी करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याच्या वर्तणुकीमुळे नागरिक कमालीचे संतापले होते
चौकशी करून कारवाई करा
गावातील नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आमसभेचे आयोजन केले जाते सभेचे अध्यक्ष सचिव व ग्रामपंचायतचे कर्मचारी सभेला उपस्थित असताना सभेत नागरिकांना प्रवेश देणे न देणे नागरिकांच्या समस्या जाणून त्यावर विचार विनिमय करून त्या कशा पद्धतीने सोडविता येईल ही जबाबदारी अध्यक्ष व सचिवाची असतात मात्र काही नेते ग्रामपंचायत सदस्य अध्यक्ष व सचिवाला न जुमानता आपले वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न करतात असेच वर्चस्व दाखविण्याच्या नादात आम सभेत नागरिक व ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली यात गावाची नाहक बदनामी झाली आम सभेतील हाणामारी व वादाचे सर्व व्हिडिओ गटविकास अधिकारी पंचायत समिती कोरपना यांना पाठविण्यात आले आहे या सर्व गंभीर प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे अन्यथा असे प्रकार येथे सुरूच राहतील
यापूर्वीही झाली होती मारहाण
नांदा ग्रामपंचायतच्या महिला आमसभेमध्ये यापूर्वी अशीच मारहाण झाली होती यात युवक काँग्रेसचे हारून सिद्दिकी यांचे डोक्यावर प्लास्टिकची खुर्ची मारून जबर मारहाण करण्यात आली होती गंभीर दुखापतीमुळे मनसेचे चंद्रप्रकाश चंद्रप्रकाश बोरकर याचेवर भांदवी कलम 323, 294, 504 अन्वये दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता काही दिवसापूर्वीच झालेल्या नांदा ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूकी नंतर झालेल्या पहिल्याच आमसभेत तुंबळ हाणामारी मुळे मनसेचे नेते असलेल्या ग्रामपंचायत सदस्य चंद्रप्रकाश बोरकर , निनाद बोरकर , पवन मोरया , नितीन लोहबडे , हारून सिद्दिकी, मुन्ना सिद्दिकी , आलम खान यांचेवर गडचांदूर पोलीस स्टेशनला भांदवी कलम 323 , 294 व 506 अंतर्गत अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास व कारवाई गडचांदूर पोलीस कऱीत आहे