लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
घुग्घुस येथील बँक ऑफ इंडियाच्या मागील वसाहतीत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्यामुळे नालीचे खोलीकरण करून सिमेंट काँक्रिटचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे.
या वसाहतीत राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात पावसाळ्यात पूराचे पाणी शिरले होते. त्यामुळे काही घरे क्षतीग्रस्त होऊन साहित्याचे मोठे नुकसान झाले होते.
ही समस्या लक्षात घेत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वेकोलिच्या व रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही समस्या तत्काळ सोडविण्यासाठी सांगितले.
त्या अनुषंगाने वेकोलितर्फे बँक ऑफ इंडियाच्या मागील परिसरात नालीचे खोलीकरण करून बांधकाम सुरु करण्यात आले आहे.
त्यामुळे आता पावसाळ्यातील पूराचे पाणी नाली द्वारे तलावात जाणार आहे त्यामुळे आता पूराचा फटका बँक ऑफ इंडिया मागील वसाहतीच्या परिसराला बसणार नाही.
बँक ऑफ इंडिया मागील परिसरातील नालीच्या बांधकामाची पाहाणी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केली.
यावेळी भाजपाचे संजय तिवारी, राजेश मोरपाका, सतीश बोंडे, गौरव ठाकरे, असलाम कुरेशी व वार्ड वासीय उपस्थित होते.