भारत जोडो यात्रेत आदरणीय खा. राहुल गांधी यांच्यासोबत कोरपना येथील काँग्रेस पक्षाचे नेते श्री विजय बावणे कार्यकर्त्या सोबत सहभागी

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,

जिद्दं, चिकाटी, संयम, निर्भयता..अश्या कित्येक गुणांचा समावेश असलेली ‘सर्वसमावेशक’ भारत जोडो यात्रा प्रेमाचा संदेश घेऊन, माणसामाणसांना जोडत निघालीय.
आव्हाने, अडथळे अनेक आहेत मात्र प्रचंड ऊर्जा, उत्साह घेऊन ‘राहूल गांधी’ नावाचा हा निर्भय ‘लोकशाही विचार प्रवाह’ सतत पुढे जात राहील.
या प्रवाहात आम्हीही शामिल आहोत,हे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. वाशिम येथे भारत जोडो यात्रे दरम्यान आदरणीय खा. राहुल गांधी यांच्यासोबत कोरपना नगरीचे सर्वेसर्वा डीसीसी बँकेचे संचालक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सचिव श्री विजयराव बावणे,
तालुका अध्यक्ष उत्तम पेचे , नगराध्यक्ष नंदाताई विजयराव बावने, कॅाग्रेसचे जेष्ठ नेते सुरेश पा. मालेकर, उपनगराध्यक्ष ईस्माईल शेख, सभापती मनोहर चन्ने, सभापती आरिफा बेगम, नगरसेवक निसार शेख, देविका पंधरे, जोस्तना खोबरकर, मा.नगरसेवक उज्वला धारनकर, संगीता पंधरें, प्रशांत लोडे, उपाध्यक्ष तालुका युवक कॅाग्रेस मोबीन बेग आदरणीय खा. राहुल गांधी सोबत चालले,एकंदरीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो पडयात्रे मुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here