लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा जोगापूर हे महसूली रीठ गाव असून येथे अनेक वर्षापासून मार्गशीर्ष महिन्यात पवित्र हनुमान मंदिर देवस्थान येथे जोगापूर ची यात्रा भरवण्यात येते. जवळपास एक ते दीड लाख भाविक येथे दर्शनासाठी येतात. या गावांमध्ये मंदिराचे व्यवस्थापनावरून वाद असल्यामुळे राजुरा महसूल विभाग मंदिराचे विश्वस्त म्हणून काम करीत आहे. या वनपरिक्षेत्रामध्ये एकूण सहा वाघ, त्यांचे पिल्ले, रानगवे, नीलगाय सायाळ, हरीण, चौसिंगा, रानडुक्कर, तृणभक्षी असे वन्यजीव असून हिंस्र प्राणी भाविकांसाठी चिंतेची बाब आहे. याबाबत बॅनर लावून व अन्य माध्यमातून जनजागृती करणे, जोगापूरसाठी राजुरा ते जोगापुर, टेंबूरवाही ते जोगापूर खांबाळा ते जोगापुर, विहीरगाव ते जोगापूर या रस्त्यांनी भाविकगण ये – जा करतात, या चार मार्गा व्यतिरिक्त अन्य कच्च्या मार्गाने ये – जा करण्यास बंदी करण्यात आली. भाविकांना दर्शनाकरिता सकाळी ७ वाजता ते सायंकाळीं ५ वाजेपर्यंत वेळ निर्धारित करण्यात आली, कोणालाही रात्री मुक्काम करता येणार नाही. भाविकांना क्षेत्रात स्वयंपाक करण्यास बंदी , पूजेचे साहित्य, प्रसाद, खेळणी इत्यादी दुकाने लावण्यास बंदी आहे, भाविकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहाची व्यवस्था करणे, यात्रा सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी गाव स्तरावर समिती स्थापन करून, वनविभाग, पोलीस आदींच्या सहकार्याने जत्रा सुरळीत पार पाडण्याच्या सुचना आ. धोटे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पवित्र हनुमान मंदिर येथे भाविकांना जाण्या येण्यासाठी व्यवस्थित सोयी उपलब्ध करणे, संवेदनशील परिसर असल्याने भाविकांनी सुध्दा आपली काळजी घेणे आवश्यक असून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे कोणत्याही भाविकांचे जीव धोक्यात येणार नाही यासाठी वनविभागाने योग्य बंदोबस्त ठेवण्याच्या व सर्व विभागाने उत्तम व्यवस्थापन करण्याच्या सूचना आमदारांनी केल्या.
या प्रसंगी माजी अॅड. आमदार संजय धोटे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार हरिष गाडे, उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, उपविभागीय अभियंता आकाश बाजारे, संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगरदेवे, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकिय अधिकारी डॉ. लहू कुळमेथे, पोलिस निरिक्षक राहुल चव्हाण, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जैन, महसूल निरिक्षक सुरेश साळवे, क्षेत्रसहायक प्रमोद मत्ते, संतोष संगमवार, नरेंद्र देशकर, नेफडो अध्यक्ष तथा पत्रकार बदल बेले, जाधव मॅडम, प्रा. राजेश खेरणी, प्रा. गुरुदास बल्की यासह वन विभागाचे कर्मचारी उपस्थीत होते.