ग्रामपंचायत निवडणूकी संदर्भात महाविकास आघाडीचे बैठका सुरू

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 16 नोव्हेंबर 2022मध्या महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूकांचे बिगुल वाजले असून या निवडणूकीत रायगड जिल्हयातील उरण तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. शासन निर्णयानुसार उरण मधील 18 ग्रामपंचायतीचे निवडणूक 18 डिसेंबर 2022 रोजी होणार आहेत. ग्रामपंचायतच्या निवडणूकीला तसेच प्रचाराला कमी वेळ असल्याने उरण तालुक्यातील गावा गावात आता बैठका सुरू झाल्या आहेत. काही बैठका औपचारिक व काही बैठका अनौपचारिक ही घेतल्या गेल्या आहेत.ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याच्या उद्देशाने शिवसेना, भारतीय काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले असून या एकत्रित पक्षांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा संकल्प केला आहे.त्या अनुषंगाने महाविकास आघाडी तर्फे सोमवार दि 21/11/2022 रोजी सकाळी 10 वा. पुनाडे, 11 वा. वशेणी, 12 वा सारडे, दुपारी 1 वाजता पिरकोन, 2 वा. कळंबुसरे, दु.4 वा चिर्ले,सायंकाळी 5 वा धुतुम,6 वा.करळ /सावरखार तर मंगळवार दिनांक 22/11/2022 रोजी सकाळी 10 वा. जसखार, 11 वा – पागोटे , दुपारी 12 वा. नवघर, दु.1 वा.भेंडखळ, दु.2 वा. डोंगरी, 4 वा.पाणजे,5 वा.बोकडविरा, सायंकाळी 6 वा. नविन शेवा या ठिकाणी गाव बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नरेश रहाळकर, महादेव घरत, संतोष ठाकूर, बी. एन.डाकी, गणेश शिंदे, कमळाकर पाटील, भारतीय काँग्रेस पक्षाचे विनोद म्हात्रे, डॉ. मनिष पाटील, बाजीराव परदेशी, किरीट पाटील,प्रकाश पाटील,महेंद्र ठाकूर,शेतकरी कामगार पक्षाचे विकास नाईक, नरेश घरत, सुरेश पाटील, महादेव बंडा,सागर कडू,रमाकांत म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनोज भगत,वैजनाथ ठाकूर, भार्गव पाटील, समाधान म्हात्रे,गणेश नलावडे,रमण कासकर तसेच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचे या बैठकीला मार्गदर्शन लाभणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here