लोकदर्शन👉मोहन भारती
बाखर्डी:- कोरपना तालुक्यातील निमणी येथील शेतकऱ्यांने सततच्या नापिकी व बँकेच्या वाढत्या कर्जबाजारीपणामुळे आपल्या शेतात दुपारी १२ वाजता विष प्राशन करून आत्महत्या केली.भाऊजी नामदेव टोंगे वय ६२ वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नावं आहे
सकाळच्या सत्रात ते शेतात काम करायला गेल्याने दुपारी १२ वाजता दरम्यान विष प्राशन केल्यानंतर त्यांचा किंचाळण्याचा आवाज आल्याने परिसरातील शेतकरी धावले व त्यांना ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे नेत असतांना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला
त्यांना निमणी येथे स्वतःची ३ एकर शेती असून स्टेट बँक लखमापूर १ लाख रंगनाथ स्वामी बँकेचे ६० हजार तर बचत गटाचे १ लाख रुपये घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची कशी याची चिंता भाऊजी टोंगे यांना होती सततच्या नापिकीमुळे व शेतीत जास्त खर्च झाल्यानें भविष्यात वाढते कर्ज फेडायचे कशे याचं काळजीत ते काही दिवसांपासून होते अखेर त्यांनी शेतात विष घेऊन आपली जीवनयात्रा संपवली त्यांना पत्नी एक मुलगा दोन मुली सून नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे