लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि 14 नोव्हेंबर 2022रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई, ता. उरण जि. रायगड. या विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग यांनी भारताचे पहिले पंतप्रधान आणि थोर स्वतंत्र सेनानी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपल्या अध्यक्षीय मनोगतात चाचा नेहरूंचे भारताच्या जडणघडणीत असलेले योगदान आणि त्यांचे प्रेरणादायी चरित्र सांगितले. विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका पाटील एस. एस यांनीही पंडित नेहरूंचे जीवन कार्य आपल्या मनोगतातून मांडले. तसेच रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नुरा शेख यांनी श्रीफळ वाढउन मुलांच्या लाडक्या चाचा नेहरू चे बालपण मनोगतातून सांगितले.या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील कु.दक्षता खिल्लारे, कु. हिमांशी शुक्ला, कु.योगिता होलंबे, कु.साक्षी मुळे, कु.अंकिता पवार या विद्यार्थ्यांनीनी चाचा नेहरूंवर आपले विचार प्रकट केले . हा कार्यक्रम इयत्ता सातवी ब या वर्गाने आयोजित केला होता. आणि त्या वर्गाच्या वर्ग शिक्षिका म्हात्रे के.के यांनीही पंडित नेहरू यांच्या वर विचार प्रकट केले.शेवटी उपस्थित मान्यवरांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.