लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि १४ नोव्हेंबर 2022जेएनपीए सारख्या जागतिक कीर्तीच्या बंदरात कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे कॉम्रेड भूषण पाटील हे जेएनपीए च्या कामगार प्रतिनिधी(विश्वस्त) म्हणून शेवटची निवडणूक लढवत आहेत. मात्र या निवडणुकीत त्यांनी कामगारांसाठी तीन दशके(३३ वर्षे)अहोरात्र काम केले आहे. या कामगारांच्या सुख,दुःखात, अडीअडचणीत कोणताही भेदभाव न राखता धावून येणारे कामगार नेते म्हणून त्यांची ओळख आहे. जेएनपीए मधील कामगार व त्यांच्या कुटुंबातील एक भाग(आपला माणूस) ही त्यांची ओळख सर्वश्रुत आहे. कामगारांच हित आणि त्यांचा उत्कर्ष या शिवाय कोणताही स्वार्थ न पाहणारा आणि तब्बल २२ वर्षे कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे ते एकमेव प्रामाणिक नेते आहेत. जेएनपीए मधील कामगारांना अधिक अधिक वेतनवाढ, वैदयकीय सुविधा, भविष्यात कामागर निवृत्तीनंतर निर्माण होणारे प्रश्न कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबियांचे भविष्य याचा ही विचार करून त्यासाठी प्रयत्नशील असलेला नेता. कामगारांच्या भविष्याची दूरदृष्टी असलेले कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील आहेत. आजच्या बाजारीकरण झालेल्या व व्यवस्थापन सुलभ कामगार चळवळीत कोणत्याही आमिषाना बळी न पडलेले केवळ कामगार हित हेच उद्दीष्ट व धय्ये असलेले कामगार नेते आहेत. विरोधी कामगार नेत्यांनाही त्यांचा प्रामाणिक पणा मान्य करावा लागतो. हेच त्यांचे मोठेपण आहे.
कामगारांनी व्ही आर एस घेतली म्हणजे कामगाराचा उपयोग संपला आता तो आपला मतदार राहिला नाही. असे न समजता कामगार हा कामगार आहे.तो निवृत्त झाला काय किंवा त्याने व्ही आर एस घेतली काय कामगाराला मान सन्मान देणारे कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील आहेत. कामगारांच्या हिताच्या रक्षणासाठी विरोधकांना एकत्रित करून लढणारे कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील या सर्वमान्य कामगार नेत्यांना मोठ्या मतांनी निवडून येतील अशी आशा समस्त कामगार व स्थानिक जनतेनी जेएनपीए कामगारांनी व्यक्त केली आहे.