उरण येथे मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

 

उरण दि १४ नोव्हेंबर 2022दिनांक १३नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळीं ११ वा. उरणमध्ये समाज प्रबोधन शिक्षण संस्थेच्या शाळेत आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO )यांचे वतीने असंघटित क्षेत्रातील (नाका) कामगारांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये माजी निवृत्त कामगार आयुक्त अधिकार शाम जोशी (सल्लागार कामगार संघटना) हिंद मजदुर सभा सलग्न जनरल मजदुर सभा व टेक्सटाइल कामगार सभा ठाणे जनरल सेक्रेटरी प्रशांत श्येट्ये,जगदीश उपाध्याय, कोकण श्रमिक संघ पनवेल खजिनदार एकनाथ ठोंबरे, कार्यशाळा आयोजक सुनिल विश्वनाथ जोशी,शाम जोशी यांनी कामगार कायदे व ईश्रम कार्ड ईमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ बोर्ड घरेलु कामगार मंडळ बोर्ड यांची उपस्थितांना माहिती दिली व त्यामध्ये नोंदनी करणे बाबत आवाहन केले. यावेळी जगदीश उपाध्याय, प्रशांत शेट्ये, एकनाथ ठोंबरे यानींही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी चार फाटा/नाईक नगर/ठाकुर नगर एंजल गेट ओएनजीसी /येथील नाका कामगार व झोपडट्टीवासीय महिला पुरूष युवा कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. राम झिने, कैलास राठोड, प्रकाश शरणागत,खडसे ताई,रंजनाताई यांनी आपल्या समस्या यावेळी मांडल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here