माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा करिश्मामुळे शिवसेनेत मोठे इनकंमिंग उरण शहरातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 14 नोव्हेंबर 2022
उरण नगरपालिकेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे, तसे तसे उरण शहरात राजकीय घडामोडी घडायला लागल्या आहेत,रविवार दिनाकं 13 नोव्हेंबर 2022 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली उरण शहरातील मुस्लिम मोहला व कासमभाट विभागातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षात पक्ष प्रवेश केला. यामध्ये मोहम्मद वकील अंसारी,हमीदा खातून,हसीना खातून,गुलषण जहान,नुर सबा,अब्दुल कलाम षाह,अब्दुल रहमान षाह,मोहम्मद सुलेमान षाह,शाहीद अंसारी, हाजरा अंसारी,मेहराब अंसारी, रझीया ईमरान शेक,अजमेरी खातून,शबनम खातून, ईरफान अंसारी,मकसूद अंसारी,फरयाझ, अंसारी,सरफराझ अंसारी,सबीहा खातून, अल्लाउद्दीन अंसारी व कार्यकर्ते यांचा समावेश आहे. या वेळी जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर व शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी भगवी शाल अर्पण करून सर्वांचे शिवसेना(श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात स्वागत केले.दिवसेंदिवस उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्ष प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे उरण मध्ये शिवसेना भक्कम होत आहे.

या कार्यक्रमास गटनेते गणेश शिंदे ,नगरसेवक अतुल ठाकूर, नगरसेवक समीर मुकरी,युवासेना शहरप्रमुख नयन भोईर, अल्पसंख्याक सेलचे विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम,महिला तालुका अध्यक्ष हुसेना शेख, शाखाप्रमुख समीम शेख, उपशाखाप्रमुख शाहरुख गडी, रामचंद्र मोकळ, महमंद शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *