समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेच्या मागण्या मान्य. ♦️तूर्तास आंदोलनाला स्थगिती.

 

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 15 नोव्हेंबर 2022 विविध मागण्या पूर्ण होत नसल्याने जे.एम. बक्षी(एम आय सी टी व्यवस्थापन)भेंडखळ या कंपनी विरोधात समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेने दिनांक 15/11/2022 रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेच्या आंदोलनाची अगोदरच दखल घेते एम आय सी टी कंपनी व्यवस्थापनाने सर्व मागण्या मान्य केल्याने संघटनेच्या वतीने करण्यात येणाऱ्या तीव्र आंदोलनाला तूर्तास स्थगिती दिल्याची माहिती समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष अतुल भगत यांनी दिली.

दि. 14 नोव्हेंबर 2022 रोजी जे.एम बक्षी (MICT) भेंडखळ -उरण या कंपनीत जे. एम. बक्षी कंपनीचे एच आर गावंड सर व ठेकेदार कंपनी श्री सदगुरू फ्रेट सर्विसेसचे व्यवस्थापक किशोर कडू व गजानन यांच्या समवेत कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात चर्चा करण्यात आली.कंपनीने मागण्या मान्य केल्याने तसेच कामगारांतर्फे समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेने मागण्या मान्य केल्याने सदर 15 नोव्हेंबर 2022 रोजीचे आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे.यावेळी समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष अतुल भगत, संघटनेचे पदाधिकारी, सफाई कामगार,उरण पोलिस स्टेशनचे अधिकारी जाधव उपस्थित होते.

मान्य झालेल्या मागण्या खालील प्रमाणे –

1) अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला रंजना लक्ष्मण ठाकूर यांचा प्रश्न मार्गी लावला.ज्यामध्ये लक्ष्मण ठाकूर यांची ग्रॅज्युईटी तसेच रंजना ठाकूर यांना मिळणाऱ्या पगारामध्ये असलेली तफावत रक्कम येणाऱ्या 14 डिसेंबर च्या आधी मिळेल.

2) हिरा भगत व द्वारका पाटील या सेवा निवृत्त झालेल्या कामगारांना सुद्धा सेवा निवृत झाल्या नंतर मिळणारी कायदेशीर देणी ही नविन करारा नुसार देण्यात येईल.तसेच त्यांना PF संदर्भात जी काही कागदांची पूर्तता करायची आहे ती करून त्यांचा PF लवकरात लवकर जमा केला जाईल.

3) जुना करार हा सफाई कामगारांना लागू होत नसल्यामुळे लवकरच युनियन तर्फे नवीन करार करण्यात येईल.

4)सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रत्येक कामगारांना किमान 5 लाख रुपये तरी कंपनी कडुन मिळावे अशी तरतूद केली जाईल.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *