लोकदर्शन अमरावती 👉राजू मधुकरराव कलाने
15 नोव्हेंबरसं 2022
पूर्ण भारत देशा ला स्वातंत्र्य मिळवण्याकरिता अनेक क्रांतीकारांनी आपल्या प्राणाची अवधी दिली. हे आपण सर्व भारतीयांना अवगत आहे . मात्र या सर्व क्रांतिकार्यांना शस्त्र कलेचे शिक्षण व तालीम शिकवणारे युवकांच्या मनात क्रांतीचा ज्वलंत ज्वालामुखी होणारे वस्ताद लहुजी राघोजी साळवे एक मातंग समाजाचे आद्यक्रांतीगुरु म्हणून इंग्रजांच्या काळामध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात आपला सिंहाचा वाटा देणारे साळवे घराणे यांना मात्र इतिहासातील पानांमध्ये जागा मिळाली नाही. अशा थोर महापुरुष पराक्रमी योद्धा वस्ताद लहुजी साळवे यांची 228 वी जयंती हे 14 नोव्हेंबर 2022 रोजी संपूर्ण भारतभर साजरी करण्यात येते. त्याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा भातकुली तालुक्यातील येणारे गाव दाढी (पेढी) येथे आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे बहुद्देशीय संस्था डाळी पिढी अमरावती यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात रात्री 8 वाजताच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आद्यक्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या फोटोला पुष्पगुच्छ करून करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान सदर कार्यक्रमाचे प्रबोधन व मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष राजू मधुकरराव कलाने यांनी उपस्थित मातंग समाज बांधवांना प्रबोधन करून लहुजी वसादांनी आपल्या क्रांतीची मजाल पेटवत संपूर्ण भारताला अनेक क्रांतिकारी गळून दिलेत. त्याचप्रमाणे मातंग समाजातील नवयुवकांनी वस्ताद लहुजी साळवे यांचा वारसा जोपासावा असे प्रबोधन व मार्गदर्शन त्यावेळी त्यांनी केले . मातंग समाजाला दखलपात्र करण्याकरिता लहुजी वस्ताद प्रमाणे क्रांतीची मशाल आपल्या शैक्षणिक क्षेत्राद्वारे उच्चशिक्षित होऊन आपल्या समाजाची प्रगती होण्यास हातभार द्यावा असे अनुमोदन कार्यक्रमादरम्यान केले. या कार्यक्रमांमध्ये संस्थेचे संत अध्यक्ष राजू मधुकरराव कलाने, उपाध्यक्ष गजानन भारत मानमोडे ,कोषाध्यक्ष श्रीकृष्ण मधुकरराव कलाने, सचिव मंगला प्रवीण खडसे, सदस्य अंकुश श्रीकृष्ण तायडे ,महादेव नारायण इंगोले, कैलास भोनाजी भोकरे, वामन शामराव तायडे, मधुकर बिसन कलाने, श्रीकृष्ण वामन तायडे, अमोल भारत मानमोडे श्रेयश गजानन मानमोडे, प्रवीण केसव खडसे,मारोती मधुकरराव कलाने,अभिषेक श्री.कलाने दुर्गेश श्री.तायडे,महिला विमला वा. तायडे ,बयना म.कलाने,नंदा श्री.तायडे, जोशना गजानन मानमोडे ,प्रणिता मारोती कलाने,परी बा.कलाने ,स्वरा म कलाने,वैष्णवी ग. मानमोडे तथा मोठ्या प्रमाणावर गावातील नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहित राऊत तथा आभार राहुल चव्हाण यांनी मानले.