लोकदर्शन 👉 शुभम पेडामकर
कॉलेज म्हंटल की आली ती दंगामस्ती, दंगामस्ती सोबत चातक पक्ष्याला जशी पावसाची ओढ असते तसेच विद्यार्थ्यांना वेध लागतात ते महोत्सवांचे. अभ्यासासोबत वैविध्य उपक्रम करायला विद्यार्थ्यांना फार आवडतात आणि याच उप्रकमातून विद्यार्थी देखील घडत असतात.
सध्या सर्वत्र महोत्सवांचे वारे वाहत असताना चर्चा आहे सेंट झेवियर्स महाविद्यालयाने आयोजित केलेल्या IKSHANA 2022 या मीडिया फेस्टची. विविध स्पर्धा आणि त्याचं सादरीकरण असलेल्या या फेस्ट मध्ये यंदा आकर्षण ठरलं ते म्हणजे शॉट फिल्म कॉम्पिटिशन. एकूण 200 स्पर्धक सहभागी असणाऱ्या या स्पर्धेत सायन येथील गुरु नानक महाविद्यालयाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून रोख रु. 50,000/-, सन्मान चिन्ह देऊन निखिल चौरसिया, विष्णू अज्जी, हफसा खान, प्रणय खंडागळे, जॉर्डन सिंग, लावण्या खतरी, प्रेरणा खेमानी, सौरभ शर्मा, केवल दोशी, निशा उपाध्याय या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागाच्या प्रमुख अमरीन मोगर यांनी विद्यार्थी चे कौतुक केले व भविष्यात अशीच नवनवीन शिखरे गाठावी यासाठी शुभेच्छा दिल्या. याखेरीज महाविद्यालयाच्या प्राचार्या. पुष्पिंदर भाटिया यांनी देखील विद्यार्थ्याना आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्वच स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
शुभम पेडामकर