लोकदर्शन👉मोहन.भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती बालक दिन म्हणून साजरी करण्यात आली,
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या स्मिताताई चिताडे होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की, एम सी व्ही सी विभाग प्रमुख प्रा,अशोक डोईफोडे, जेष्ठ प्रा प्रफुल्ल माहुरे होते,सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
बालक दिन निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम क्रमांक समय पारखी,द्वितीय धनश्री नागोसे,तृतीय क्रमांक संदीप मलिक याने पटकीवला,
माध्यमिक गटात प्रथम क्रमांक स्वयंवरी चौधरी, द्वितीय सृष्टी टोंगे, तृतीय क्रमांक मोहिनी कुबडे यांनी पटकीवला, उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक आदित्य तुपसुंदर,द्वितीय क्रमांक प्रिया झाडे,तृतीय क्रमांक प्रज्ञा दवणे,व प्रोत्साहनपर पुरस्कार श्रुती भेंडारे,व अस्मिता पवार यांनी पटकावला,विजेत्या सर्व स्पर्धकांना पारितोषिके अतिथी च्या शुभ हस्ते वितरित करण्यात आली,
प्रा,नितीन वाढई यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जीवनावर प्रकाश टाकला,कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन वामन टेकाम यांनी केले, याप्रसंगी दिन विशेष समिती च्या प्रमुख प्रा नंदाताई भोयर, व इतर शिक्षक, विद्यार्थी, व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,