लकदर्शन 👉 मोहन भारती.
,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,
दिव्यांगांसाठी महाराष्ट्रात पहिले स्वतंत्र मंत्रालय होत असल्याने गडचांदूर येथे प्रहार दिव्यांग संघटना च्या वतीने पेढे वाटून आनंद व्यक्त केला, दिव्यांग बांधवांना पेढे वाटून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. सतिश बिडकर,प्रमोद मोहूर्ले, नितीन सपकाळ यांनी मार्गदर्शन केले,तसेच आगामी जागतिक अपंग दिनानिमित्त ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी मंजुनाथ शेगोकार, पवन येनगुंटीवार, वाजिद शेख, साठवणे , धरमपाल केवट, हनुमंत शेंडे, साजित हलदर, महादेव विश्वास, राजलक्ष्मी वरभे. , सूरज बार, आणि ममता निषाद उपस्थित होते, सर्व सभासदांचे प्रहार दिव्यांग संघटना तर्फे आभार व्यक्त करण्यात आले.