बालदिनी सखी श्रावणीतर्फे बालकांना पोषक भोजनासह शैक्षणिक साहित्याचे वाटप

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात

भुसावळ – तालुक्यातील दर्यापूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत 14 नोव्हेंबर बालदिनाचे औचित्य साधून भुसावळ येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे बालकांना पोषक भोजनासह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, भुसावळ गटसाधन केंद्राचे विषयतज्ञ संजय गायकवाड, श्रीकौशल काॅमर्स अकॅडमीच्या संचालिका मिस संगिता लुल्लु यांची उपस्थिती होती. दर्यापूर जि. प. शाळेचे मुख्याध्यापक भिमराव गोसावी यांनी केले. बालकांच्या हातुन केक कापून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मनोगत व्यक्त करताना सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. राजश्री नेवे म्हणाल्या की, 14 नोव्हेंबर बालदिनाचे औचित्य साधून संस्थेतर्फे दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते. यंदा बालकांना पोषक भोजनासह शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे. भविष्यात संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना आवश्यक वस्तूंची मदत नक्कीच दिली जाईल. गरजेची वस्तू बालकांना मिळाल्यावर बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद खूपच वेगळा असतो व त्यामुळेच आपल्याला आनंद मिळत असल्याचेही सौ.राजश्री नेवे यांनी आपले मत व्यक्त केले.
संगीता लुल्लु म्हणाल्या की, बालकांना अभ्यासाबरोबर त्यांचा सर्वांगिण विकास, स्वच्छता, परिस्थितीनुसार त्यांच्या गरजा काय आहेत याकडे लक्ष द्यायला हवे. आम्ही जागृत नागरिक म्हणुन फुल न फुलाची पाकळी मदत विद्यार्थांना नक्कीच करत जाऊ, असेही आश्वासन त्यांनी दिले.
शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान म्हणाले की, सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे आज बालकांसाठी जो उपक्रम राबविला आहे, तो अतिषय प्रशंसनीय व विद्यार्थांना शाळेत येण्यास प्रोत्साहन देणारा आहे. सौ. राजश्री नेवे यांनी खरोखर विद्यार्थांसाठी हा जो बालदिन उत्साहात साजरा केला आहे तो अतिशय सुंदर आहे. त्यांचे कार्य खूप छान आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत असल्याचेही श्री. प्रधान म्हणाले. कार्यक्रमासाठी बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजश्री नेवे यांनी तर आभार भुसावळ गटसाधन केंद्राचे विषयतज्ञ संजय गायकवाड यांनी मानले. यावेळी कांचन शंभानी, रचना छाछड, सिमर तेजवानी, उपासना फिरके, रोशन आगिचा, क्रिष्णा अगनानी, लकी मुलचंदानी, निखिल देसाई यांची उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *