,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
*वि कॅन फाउंडेशनचे सहकार्य*
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन👉(प्रा.अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जिल्हात वाघाची ऐकायला येत असताना आता आवारपुर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या वसाहतीत वाघाचा वावर असल्याचे निदर्शनास आले असून अनेकांना दर्शन झाल्याचे बोलले जात आहे.वनसडी वनपरिक्षेत्रात येत असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट
वसाहत परिसरात मोठया प्रमाणावर झाडे आणि झुडपी सारखे जंगल असल्याने इतर प्राण्याचा वावर असतो शिकारीचा शोधात वसाहतीत वाघ घुसल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे , याच वाघाचा वावर काही दिवसा इरई, बोरगाव ,परिसरात होता,
वाघ म्हटल्यावर अनेकांना घाम सुटते परंतू कंपनी वसाहतीत मागील पाच ते सहा दिवसापासून वाघ कंपनी परिसरात वावरत आहे,
अल्ट्राटेक सिमेंट कंपनी वसाहत अतिशय सुरक्षित व कडक नियम लावून याचे पालन केल्या जात आहे
अल्ट्राटेक वसाहत ही झाडा झुडपाणी वेढली आहे. इथे नेहमीच शिकार मिळत असल्याने या पूर्वी देखील वसाहतीत वाघांनी मुक्काम ठोकला होता हे विशेष , कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी वन विभाग अधिकारी प्रयत्नशील असून वनपरिक्षेत्र अधिकारी अरुणा चौधरी यांच्या मार्गदर्शनात २४ तास गस्त सुरू असून वाघाच्या हालचाली वर बारीक लक्ष ठेवून आहे. यामध्ये वाईल्ड लाईफ इन्वारमेंट कन्झ्ररवेशन नेचरिंग (विकॅन) फौउडेशन देखील वन विभागाला सहकार्य करत आहेत.
वन विभाग कर्मचाऱ्याच्या सतर्कमुळे वाघाने कोणतीही हानी केलेली नाही, गुलाबी थंडीची चाहूल सुरू आहे , अशा थंडीत वनसडी वन विभाग कर्मचारी टीम वाघाच्या बंदोबस्त करण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत हे विशेष.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
नागरिकांच्या व वाघाच्या सुरक्षेकरीता वन विभागाची टीम दिवसरात्र प्रत्यन करत आहेत. वन विभागाला वि कॅन फाउंडेशन टीम सहकार्य करत आहेत.
– प्रितेष मत्ते
,