लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि १३ नोव्हेंबर २०२२ शरीरसंपदा हीच खरी मौल्यवान संपत्ती आहे. शरीरसौष्ठव स्पर्धा पाहिली की तरुणांच्या मनात आपण ही अशीच पिळदार शरीरयष्टी बनविली पाहिजे अशी इच्छा जागृत होते. अशीच पिळदार शरीरयष्टी करण्याचे कार्य कोप्रोली म्हात्रे जिम येथे करण्यात येते. अशीच स्पर्धा कोप्रोली म्हात्रे जिम येथील आशुतोष म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या कामोठे महोत्सव श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत कोप्रोली गावाचे सुपुत्र परिष प्रकाश पाटील यांनी २०२२ चे कामोठे महोत्सव विजेते पद पटकाविले. तर कळंबुसरे गावातील श्रीकांत कुमार पाटील यांनी ६५ वजनी गटात ग्रुप विजेतेपद पटकाविले. दोन्ही स्पर्धकांना पुरस्काराने गौरविण्यात आले. अथक परिश्रमातून त्यांनी हे यश प्राप्त केले. तसेच त्यांनी पेण फेस्टिवल महोत्सव येथे देखिल द्वितीय क्रमांक पटकाविले होते. या यशाने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच प्रमाणे त्यांचे मार्गदर्शक कोप्रोली म्हात्रे जिमखान्यातील आशुतोष म्हात्रे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धे दरम्यान प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहण्यात आली. सदर स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आयोजकांनी परिश्रम घेतले