लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि १२ नोव्हेंबर उरण तालुक्यातील नवघर गाव व गाव परिसरातील विविध समस्या व ग्रामस्थांच्या मागणी संदर्भात मागील गेल्या दहावर्षा पासून रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील आणि मर्मगंध पाटील या पितापुत्रांनी सातत्याने अर्ज विनंत्या करून, सतत पाठपुरावा करून सुद्धा सिडको प्रशासनाला जाग येत नाही. सिडको प्रशासनाने जाणून बुजून नवघर ग्रामस्थांच्या समस्या व मागणी कडे दुर्लक्ष केल्याने नवघर ग्रामस्थ १५ नोव्हेंबर २०२२ रोजी द्रोणागिरी सिडको येथे लाक्षणिय उपोषण करणार आहेत. झोपलेल्या सिडको प्रशासनाला जागे करण्यासाठी पुन्हा एकदा सिडको विरोधात उपोषण करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.अनेक अर्ज विनंत्या करून सिडको प्रशासनाला जाग येत नाही.म्हणून दि.६ जून २०२२ रोजी नवघर ग्रामस्थांचे प्रा.एल.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली नव्याने होऊ घातलेल्या नवघर रेल्वे स्टेशनला नवघर रेल्वे स्टेशन हेच नाव देण्यात यावे,नवघर ते नवघरफाटा रूग्णवाहीका तसेच छोटी वहाने येण्या-जाण्यासाठी रेल्वे क्राॅसिंग रस्ता करणे,मौजे नवघर येथे होणा-या रेल्वे स्टेशनमध्ये निर्माण होणा-या नोक-या आणि व्यवसायामध्ये स्थानिक मौजे नवघर सिडको प्रकल्पग्रस्तांना प्रथम प्राधान्य द्यावे तसेच इतर मागण्यांसाठी द्रोणागिरी नोड सिडको कार्यालय बोकडवीरा येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी द्रोणागिरी नोडचे अधिकारी नहाने यांनी सिडकोचे वरिष्ठ अधिकारी सेवतकर यांच्या सोबत आॅन स्पीकर फोनवर प्रा.एल.बी.पाटील सहीत नवघर ग्रामस्थांची चर्चा घडवून दिली असता प्रा.एल.बी.पाटील यांनी येथील रेल्वे स्टेशनमुळे उद्भवणा-या समस्या सिडकोचे वरिष्ठ अधिकारी सेवतकर यांना समजावून सांगितल्या असता आपल्या समस्या योग्य असून नवघर ग्रामस्थांची सिडकोच्या वरिष्ठ अधिकारी तसेच रेल्वे प्रशासना सोबत सयुक्त बैठक घेऊन योग्यच निर्णय घेण्याचे मान्य केले केले होते .सिडको आधिकारी सेवतकर आणि नहाने यांच्या सोबत झालेल्या चर्चे नुसार तूर्तास उपोषण स्थगित करण्यात आले असता जर १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन जर योग्य निर्णय दिला नाही तर १५ सप्टेंबर नंतर आम्ही नवघर ग्रामस्थ उग्र आंदोलन करणार असे ग्रामस्थांसहीत रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील यांनी ठणकावून सांगितले होते. असे असताना सिडको प्रशासनाला याची जाणीव नाही असेच दिसून येत आहे तसेच नवघर ग्रामस्थांच्या लाक्षणिक उपोषणाच्या वेळी झालेल्या वाटाघाटीच्या चर्चेचा सिडको प्रशासनाला विसर पडलेला दिसत आहे. ग्रामस्थांना सिडको व रेल्वे प्रशासनाकडून कोणतेही योग्य ते प्रतिसाद अजूनही मिळाला नाही.म्हणून या गेंड्याच्या कातडीच्या सिडको प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी पुन्हा जेष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवघर ग्रामस्थांनी १५ नोव्हेंबर २०२२ रोजी ठिक १०-३० वाजल्यापासून द्रोणागिरी नोड, सिडको कार्यालय बोकडवीरा येथे लाक्षणिय(उपोषण)धरणे आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. या उपोषणाला ग्रामस्थांनी,नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, विविध सामाजिक संस्था, संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपोषणाला जाहीर पाठिंबा द्यावा असे आवाहन जेष्ठ साहित्यिक, रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील यांनी केले आहे.