लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 11 नोव्हेंबर 2022 ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था संचालित रामचंद्र म्हात्रे विद्यालय अँड ज्युनि. कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स, आवरे- तालुका- उरण, जिल्हा- रायगड या ठिकाणी गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत माता-भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बाबासो कालेल यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती म्हात्रे, डॉ. स्नेहल कोळी, डॉ. अश्विनी खडकीकर, डॉ. सुरेश पाटील, डॉ. रामदास देसले, आरोग्य अधिपरिचारिका संजीवनी म्हात्रे, संगीता शिंदे, हिरा वीर, प्राची पाटील, विलासिनी कोळेकर, औषध निर्माण अधिकारी बालाजी शेमाडे, जितेंद्र कोळी, संतोष पगारे, महादेव पवार यांची उपस्थिती होती.
या आरोग्य शिबिरात आवरे, पाले, कडापे, गोवठणे, पिरकोन, वशेणी, चिरनेर परिसरातील मोठ्या संख्येने माता-भगिनींनी आपली उपस्थिती दाखवून आरोग्य तपासणी करून घेतली तसेच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली.
मोफत आरोग्य तपासणी शिबिरात डॉ. बाबासो कालेल, डॉ. स्वाती म्हात्रे, डॉ. स्नेहल कोळी, डॉ. आदिती खडकीकर, डॉ. रामदास देसले या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय तज्ञांनी मोलाचे योगदान दिले व नेत्र चिकित्सक तज्ञ डॉक्टर सुदेश पाटील यांनी डोळ्यांच्या विकारांचे निदान केले
कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न करण्यासाठी रामचंद्र म्हात्रे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.