अनिकेत राजेश परसावार या कलाकाराची सिनेसृष्टीत उंच भरारी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️पल्याड चित्रपटात कला दिग्दर्शक म्हणून केले कार्य

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन 👉(प्रा अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण खूप प्रचलित आहे. तसंच काही या अवलिया कलाकाराबद्दल झालंआहेत. अनिकेतला लहान वयापासून चित्रपट आणि नाटकांची खूप आवड होती. जस जसा तो मोठा होत गेला, ही आवड पण आणखी वाढत गेली. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, काव्य लिखाण या सगळ्याच पातळीवर अनिकेत आपली कला प्रेक्षकांसमोर दाखवत गेला आणि त्यांची वाहवाह पण झाली. अनिकेतने कॉलेजमध्ये असताना व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटके केलीत. ‘कलंक’ (The information of HIV Aids) या डॉक्युमेंटरी फिल्मची जिल्हा पातळीवर निवड होऊन, चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला, तसेच जिल्ह्यातील काही भागात प्रोजेक्टरच्या माध्यमाने फिल्म विद्यार्थ्यांना दाखवून, जनजागृती करण्यात आली आणि इथूनच अनिकेतच्या कामाला दिशा मिळाली. त्या नंतर लहान मुलांना पैसे बचतीची सवय लागण्यासाठी ‘मिनी बँक’ ही फिल्म बनवली. या फिल्मला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद लाभला. त्याच्या सोबत अनेक सामाजिक व राजनैतिक एड फिल्म्स त्यानी तयार केल्या. या सर्व फिल्मचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः अनिकेतनेच केले आहे.

हे सर्व काम करत असताना, एका नाट्यगृहामध्ये ओळख झाली चित्रपट लेखक व दिग्दर्शक शैलेश दुपारे यांच्या सोबत. त्यांनी अनिकेतच काम पाहून त्याला ‘पल्याड’ चित्रपटात कला दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी दिली. अनिकेतने ती संधी स्वीकारली व त्या मिळालेल्या संधीच सोन केलं. कला दिग्दर्शक म्हणून काम करत असताना अनिकेतला विविध गोष्टींचा अभ्यास करावा लागला. हा चित्रपट पाहत असताना लक्षात येईल की, चित्रपटा मध्ये जितकं दिसणं महत्त्वाचं असतं, तितकच त्यात बारकाईने अभ्यास करून परिस्थितीनुसार वापरलेल्या नेपत्त्याला देखील असतं. कारण चित्रपट पडद्यावर चांगला दिसावा यासाठी चित्रपटाचा कला दिग्दर्शक पडद्यामागे दिग्दर्शका सोबत आणि कॅमेरा मॅन सोबत प्रचंड मेहनत घेत असतो. चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेमला सजवण्याचे काम कला दिग्दर्शक करत असतो.  कला दिग्दर्शक म्हणून अनिकेतचा हा प्रथम चित्रपट आहे आणि त्यांने ही जबाबदारी अत्यंत उत्तमरीत्यांनी पार पाडली आहे, असं स्वतः चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश दुपारे म्हणतात. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच प्रसिध्दीची अति उच्चतंम शिखर पार केलंय. भारतातचं नव्हे तर अमेरिका, चीन, दक्षिण कोरीया, भुतान, न्युयॉरक, स्पेंन, लडंन, हॉगकॉग, टोरंटो, टोकीयों, सिक्कींम, न्यु दिल्ली, कोलकत्ता, तमिलनाडू, ढ़ाका, मुंबई, स्विड़न, यु.एस.ए. अशा अनेक ठिकाणच्या फेस्टिवल मध्ये पल्याड चित्रपटाची स्क्रींनिंग करण्यात आली. नॅशनल आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये या चित्रपटाला अवॉर्ड सुद्धा मिळाले आहे. आज पल्याड ने अमेरिकेच्या जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’ मासिका पर्यन्त मजल मारलिय. हा चित्रपट भारतात आणि भारताबाहेर सुद्धा लोकांचे मन जिंकत आहे. त्यात अनिकेतचा लाख मोलाचं वाटा आहे. या ध्येयवेड्या माणसाने सुरुवातीपासूनच कठीण परिश्रम करून स्वतःला या चंदेरी दुनियेत सिद्ध केलय. पल्याडचा विषय वाटतो तितका सोपा अनिकेतसाठी कधीचं नव्हता. चित्रपटाची कथा ही एक ग्रामीण भागातील देवपाट गावात घडतेय. या कथेतील काल्पनिक गावाला वास्तविक गाव बनवायचे काम अनिकेतने केले आहे. झोपडी, वापरण्यात येणारे सामान, रस्ते, स्मशानभूमी , मंदिर हे सर्व उत्तमरीत्यात अनिकेतने बांधून तर काही सजवून तयार केले आहे. एलिवेट फिल्मस् आणि लावण्याप्रिया आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने पल्याड या मराठी सिनेमाची निर्मिती झाली आहेत. चित्रपटाचं शूटिंग चंद्रपुर जिल्हयातील सिंदेवाही, मरेगांव, कुकडहेटी, चिकमारा, शिवनी, राजोली, घोट या ग्रामिण भागात पार पडले. पल्याड हा सामाजिक विषयावर भाष्य करणारा, एका मसान जोगी परिवारात घडलेल्या काही कडू-गोड गोष्टीवर आधारीत संवेदनशील चित्रपट आहे. या चित्रपटाचे लेखन सुदर्शन खडांगडे व शैलेश दुपारे यांनी केले तर दिग्दर्शनाचा भार शैलेश दुपारे यांनी सांभाळला. शशांक शेंडे, देवीका दप्तरदार, विरा साथीदार, देवेंद्र दोडके व रुचित निनावे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच या चित्रपटा मध्ये २५ लोकांची टेक्निकल टीम अहोरात्र काम करीत होती. छायाकंन – मोहर माटे, मेकअप – स्वप्निल धर्माधिकारी, संकलन – मनिष शिर्के यांनी केले आहे. या चित्रपटात ४ गाणी असून चित्रपटाची गाणी अरुण सागोंळे व प्रंशात मडपुवार यांनी लिहिली आहेत व संगीत जगदीश गोमिला, सॅम.ए.आर, तुषार पारगावकर, ह्यांनी दिले आहेत. चित्रपटाचे वितरक के.सेरा हे आहेत चित्रपटाचं मार्केटींग म्हणुन काम पाहत आहे. हा चित्रपट सर्व रसिक प्रेक्षकांसाठी ४ नोव्हेंबर २०२२ ला भेटीला आला आहे.

न्यू नरेश सिनेमा,गडचांदूर मध्ये सायंकाळी सहा वाजता पल्याड हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्या दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून कोरपणा तालुक्याचे सेवानिवृत्त गटशिक्षण अधिकारी श्री. आनंदराव धुर्वे, मुख्याध्यापिका सौ. मंगला धुर्वे, सेवानिवृत्त प्राचार्य गिरिधर बोबडे, थिएटर मालीक श्री. विजय ठाकूरवार उपस्थित होते. महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील प्राचार्या सौ. स्मिता चिताडे यांच्या शुभ हस्ते पल्याड या मराठी चित्रपटातील कला दिग्दर्शक अनिकेत राजेश परसावार यांचा सत्कार करण्यात आला. त्याच्या सोबत पल्याड चित्रपटांत मुख्य भूमिका साकारणारे बालकलाकार रुचित निनावे व सह-कलाकार अमित तिफने या दोघा कलाकारांचा पण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखक-गीतकार श्री. महालींग कंठाळे यांनी केलं. तसेच कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन उप-प्राचार्य . विजय आकनुरवार यांनी केले.

आज पर्यंतच्या धावपळी विषयी प्रस्तुत प्रतिनिधीशी संवाद साधला असता अनिकेतने सांगितले की, नाटके किंवा फिचर फिल्म्स करताना मोठी जबाबदारी असते. पण आपण स्वतःहून निर्णय घेतलेल्या आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करतोय याचे मला समाधान असल्यामुळे ही धावपळ हवी हवीशी आहे. या धावपळीतून मला आनंद, ऊर्जा मिळत असल्याने मला थकवा कधीच जाणवत नाही असे अनिकेत परसावार यांनी प्रस्तुत प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *