पीपर्डा येथे सि एफ आर आराखड्या करिता टाटा सामाजिक विज्ञान संस्थान,मुंबई च्या वतिने बैठकीचे आयोजन

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन 👉(प्रा अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
ग्रा. प. पीपर्डा ता.कोरपना येथे अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६. नियम २००८ व सुधारित नियम, २०१२ नुसार कलम ५ आणि कलम ३(१)(झ) नुसार अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वन निवासी यांना “निरंतर वापर करण्यासाठी पारंपारिकरित्या संरक्षण व संवर्धन करण्यात आलेल्या कोणत्याही सामाजिक वन स्त्रोतांचे संरक्षण, पुनर्निर्माण, संवर्धन किंवा व्यवस्थापन करण्याचा हक्क” प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन निर्णय ६ जुलै २०१७ च्या अनुषंगाने सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीला अनुसूचित जमातीचे वन निवासी व इतर पारंपारिक वन निवासी यांच्या फायद्यासाठी अश्या सामूहिक वन संपत्तीचे निरंतर व समसमान व्यवस्थापन, संवर्धन, व्यवस्थापन करण्यासाठी वन विभागाच्या सूक्ष्म योजना किंवा चालू योजना , व्यवस्थापन योजना बरोबर फेरबदलानिशी एकत्रीकरण करण्याचे अधिकार प्रदान केलेले आहे.त्याच संदर्भाने 9 नोव्हेंबर ला पिपरडा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,या बैठकीत व्यवस्थापन आराखड्या विषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीत सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,ग्रामस्थ , अमोल कुकडे ,जगदिश डोळसकर( संशोधन अधिकारी),टाटा सामाजिक विज्ञान संस्थान,मुंबई यांनी मार्गदर्शन केले या शिबिरात इंदिरा कुडमेथे सरपंच सामाजीक कार्यकर्ते स .आबीद अली, रमेश डाखरे , खुशाल राठोड रविन्द्र जगताप ,सुरेखा कुडमेथे, मंगला येडमे ,मोतीराम कोरवते, प्रकाश निकट जलुकारांगे रामु येडमे यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here