उरण येथील कुमारी कृपा कृपेश परदेशी हीची मोधेरा डान्स फेस्टीवलसाठी निवड.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

 

उरण दि ९ नोव्हेंबर 2022. उरण बोरीनाका येथे राहणाऱ्या कुमारी कृपा कृपेश परदेशी हिला सन २०१५ व २०१७ मध्ये नवी दिल्ली राजपथावर झालेल्या पथसंचालनयामध्ये स्वर्गीय नितीन पाटील यांच्या साथीने २०१५ मध्ये प्रथम व २०१७ मध्ये तृतीय पुरस्कार महाराष्ट्राला मिळवून दिला. तसेच २४ ते २६ जानेवारी २०१२ मध्ये लखनौ येथे नृत्याचा कार्यक्रम केला.त्यावेळी लखनौच्या राज्यपाल माननीय श्रीमती आनंदीबेन पटेल यांना कु. कृपा कृपेश परदेशी यांचा नृत्याविष्कार खूप आवडला व त्यांनी त्यांचा नृत्याविष्कार २६ जानेवारी रोजी लखनौ परेड मध्ये सादर करावयास सांगीतले. तीला लहान पणापासून नृत्याची आवड असल्या मुळे आजपर्यंत तीने नृत्यामध्ये बरीचशी पारीतोषीके पटकावली आहेत.उत्तम नृत्य करणाऱ्या व रसिक प्रेषकांची मने जिंकणाऱ्या कु. कृपा कृपेश परदेशी हिची निवड आता गुजरात मध्ये होणाऱ्या प्रसिद्ध मोधेरा डान्स फेस्टिवलसाठी निवड झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here