लोकदर्श मुबई 👉 प्रतिनिधि
–
मुंबई : मुंबईतील ‘पीएमएलए’ कोर्टाने खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या जामीन आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची ईडीची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे आता त्यांच्या सुटकेचा मार्ग माोकळा झाला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात आज विशेष पीएमएलए न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला होता. दरम्यान, या निर्णयाला ‘ईडी’ने विरोध केला होता. पण संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांना गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने ३१ जुलैच्या मध्यरात्री अटक केली होती. गेले १०० दिवस ते आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सहभाग असल्याचा आरोप केला आहे. राऊतांच्या वकिलांनी पत्राचाळ घोटाळ्याशी त्यांचा काही संबंध नाही नसल्याचा युक्तीवाद केला. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज बुधवारी सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.