लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि. 8 नोव्हेंबर 2022 रोजगाराच्या शोधात असलेल्या नवतरुणांचे पुढील भूविष्य प्रकाशमय व्हावे. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा. पोलीस भरती साठी मैदान स्वच्छ व सुदंर असावे. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना मैदानावर योग्य रित्या सराव करता यावा या दृष्टीकोनातून सामाजिक बांधिलकी जपत विजय विकास सामाजिक सामाजिक संस्था उरण व मॉर्निंग वॉक ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यातील फुंडे येथील वीर वाजेकर विद्यालयाच्या प्रांगणात, मैदानात असलेली झाडी झुडपे काढून साफसफाई करून सदर मैदान स्वच्छ व सुंदर केला. आंतरराष्ट्रीय धावपटू प्रशांत पाटील यांना फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयाच्या मैदानात पोलिस भरतीचे सराव व मार्गदशन विद्यार्थ्यांना करायचे होते. मात्र मैदानावर सर्वत्र गवत, झाडीझुडपी असल्याने पोलिस भरतीचा येथे सराव करता येत नव्हता . हि समस्या शिक्षा अकॅडेमीचे संचालक व प्रशिक्षक प्रशांत पाटील यांनी हि बाब विजय विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोईर यांच्या कानावर टाकली.लगेचच हि समस्या विजय भोईर यांनी विजय विकास सामाजिक संस्था व मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सर्व पदाधिकारी सदस्यांना सांगितली.सदर विषय विजय विकास सामाजिक संस्था व मॉर्निंग वॉक ग्रुपच्या पदाधिकारी – सदस्यांच्या लक्षात येताच लागलीच लगेच त्यांनी स्वत: हातात झाडू, मशिन, अवजारे घेऊन परिसराची साफसफाई केली, स्वतः विजय भोईर व सर्व पदाधिकारी रविवार दिनांक 6/11/2022 पासून गवत, झाडी झूडपे काढण्याचे, साफसफाई करण्याचे काम करत आहेत. अजूनही हे साफसफाईचे काम सुरूच आहे.विजय विकास सामाजिक संस्था व मॉर्निंग वॉक ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विजय विकास सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय भोईर तथा जिल्हा परिषद सदस्य,
फुंडे कॉलेजचे प्राचार्य प्रल्हाद पवार ,पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर,सुदीप रोडलाईन्सचे मालक सुदीप पाटील,शिक्षक सेनेचे अध्यक्ष विकास ठाकूर,जेएनपीटीचे एच आर मॅनेजर भरत मढवी,पागोटे गावचे माजी सरपंच एडवोकेट भार्गव पाटील,दक्ष लॉजिस्टिक चे प्रोप्रायटर नंदकुमार तांडेल,मॉर्निंग वॉक ग्रुपचे कॅप्टन संदीप तांडेल, शिक्षा ट्रेनिंग अकॅडमी संस्थेचे प्रशिक्षक तथा संचालक प्रशांत पाटील,युवी इंटरप्राईजेसचे मालक जितेंद्र ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य जनुशेठ भोईर,फुंडे हायस्कूलच्या शिक्षिका दर्शना माळी,उद्योजक विकास भोईर,उद्योजक महेश थळी,उद्योजक धर्मेंद्र माळी, उद्योजक किशोर कडू,उद्योजक अजित तांडेल,उद्योजक मंगल कडू,उद्योजक प्रदीप कडू,उद्योजक रजनीकांत तांडेल,उद्योजक ज्योतेश तांडेल,उद्योजक हरीश दमडे,
उद्योजक ज्ञानेश्वर भोईर,उद्योजक जयप्रकाश पाटील,उद्योजक भरत पाटील,उद्योजक संजय पाटील,उद्योजक प्रशांत पाटील पागोटे,उद्योजक तथा माजी उपसरपंच विश्वास तांडेल,प्रदीप पाटील,राम पाटील आदी पदाधिकारी सदस्यांनी परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. विजय विकास सामाजिक संस्था व मॉर्निंग वॉक ग्रुप मध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, पोलीस, लेखक, कवी, राजकारणी असे सर्वच क्षेत्रातील व सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा या विजय विकास सामाजिक संस्था व मॉर्निंग वॉक ग्रुप मध्ये समावेश आहे. सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर आपापसातील मतभेद विसरून सामाजिक कार्यासाठी एकत्र येत असतात.जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम राबवून समाजात जनजागृती करण्याचा मानस यावेळी उपस्थित पदाधिकारी सदस्यांनी व्यक्त केला आहे.असे जर नागरिक, विविध सामाजिक संस्था, संघटना, विविध राजकीय पक्षांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र आल्यास उरणचा विकास होण्यास कोणीच रोखू शकत नाही.