लोकदर्शन👉 मोहन भारती
*वरोरा*:- सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून पारिवारिक सदस्यांसह वंचित, दुर्लक्षित, दिव्यांग समाजबांधवांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलविण्यासाठी आनंदवन मित्र मंडळाचे सचिव, समाजसेवक व पत्रकार राजेंद्र मर्दाने यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदवनातील स्वरानंदवन सभागृहात स्नेहमीलन कार्यक्रमांतर्गत फराळ वितरणाच्या आयोजनासोबतच ‘ राज्य बाक्सिंग ‘ चॅम्पियशिपसाठी निवड झालेल्या खेळाडूंना मुंबई जाण्यायेण्याच्या प्रवासासाठी आर्थिक सहाय्य, पवनसुत ले आऊट स्थित गणेश मंदिर परिसरात वृक्षारोपण अशा स्तुत्य उपक्रमांचे आयोजन आनंदवन मित्र मंडळ व ओशनिक बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
स्वरानंदवन सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वरानंदवनाचे व्यवस्थापक सदाशिवराव ताजने, प्रमुख पाहुणे म्हणून महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू, उत्तर कोकण विभागाचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने, आनंदवन मित्र मंडळाचे मार्गदर्शक संजीव सक्सेना, आनंदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर, बंडूभाऊ देऊळकर, राहुल देवडे, रेखाताई चंदनबटवे, आंनदवनाचे कार्यकर्ते दीपक शीव, राजेश ताजने आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. मुधोळकर म्हणाले की, राजेंद्र मर्दाने यांचे पत्रकारिता क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून त्याव्यतिरिक्त सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक व अन्य क्षेत्रातही त्यांचे भरीव योगदान आहे. आनंदवन मित्र मंडळाद्वारे शालेय विद्यार्थ्यांसाठी, वंचित घटकांसाठी काम सुरू असून सामाजिक समस्या निवारणासाठी नवनवीन उपक्रम नेहमी राबविण्यात येतात. संघाचे सचिव राजेंद्र मर्दाने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वरानंदवन चमुंसोबत फराळाचाआस्वाद घेणे, हा मंडळाच्या सामाजिक उपक्रमाचा एक भाग आहे. .
संजीव सक्सेना म्हणाले की, एक सच्चा पत्रकार कसा असावा, याचे मूर्तिमंत उदाहरण राजेंद्र मर्दाने हे आहेत.
यावेळी डॉ. मर्दाने, बंडू देऊळकर, दीपक शिव, राजेश ताजने आदींनी राजेंद्र मर्दाने यांच्या पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल तसेच संस्था राबवित असलेल्या उपक्रमांबाबत गौरवोद्गार काढले.
स्वागताला उत्तर देताना राजेंद्र मर्दाने म्हणाले की, सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून वंचित समाजबांधवाच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचे काम आनंदवन मित्र मंडळ करीत आहे. माझा वाढदिवस बहुचर्चित दिव्यांग कलाकारांसोबत साजरा करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो,असे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात सदाशिवराव ताजने म्हणाले की, चांगल्या उपक्रमातून चांगले संदेश देण्याचे काम राजेंद्र मर्दाने सातत्याने करीत असतात. त्यात मंडळाचे सदस्य डॉ. प्रवीण मुधोळकर, बंडू देऊळकर, राहुल देवडे, शाहीद अख्तर, संजय गांधी यांनी उत्तम सहकार्य करुन सर्वांना आनंदात सहभागी करत व अनावश्यक बाबींना फाटा देत वाढदिवस कार्यक्रम संस्मरणीय ठरविला.
प्रेरणादायी गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वरानंदवनातील दिव्यांग कलाकारांनी विविध लोकप्रिय गीत व युगल डान्स सादर करीत मर्दाने यांना भरभरून शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी केक कापून राजेंद्र मर्दाने यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी स्वरानंदवनातील सर्व कलाकार व उपस्थितांनी वाढदिवस स्नेहमिलन अंतर्गत फराळाचा आस्वाद घेतला. यावेळी सदाशिवराव ताजने यांनी पुस्तके भेट दिली. तदनंतर वाढदिवसानिमित्त महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ.विकास आमटे यांनी घरी बोलावून मर्दाने यांना शुभेच्छांसह शुभाशीर्वाद दिले.
तत्पूर्वी मुंबईत होणाऱ्या महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी निवड झालेल्या वरोरा तालुक्यातील खेळाडूंना वाढदिवसाचे औचित्य साधून मंडळाकडून जाण्यायेण्याचा खर्च म्हणून रेल्वे आरक्षणाचे तिकीट देण्यात आले.
वाढदिवसानिमित्त पवनसुत ले – आऊटच्या गणेश मंदिर परिसरात पर्यावरण संरक्षणच्या हेतूने आंबा, आवळा, पेरू, चंदन, जास्वद अशा विविध बहुगुणी फळ,फुल झाडांचे रोपन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात आनंदवनाचे शारीरिक शिक्षक तानाजी बायस्कर, पंकज शेंडे, प्रणय वरभे, धीरज कुंदगिर, मंडळाचे सदस्य माजी प्राचार्य बळवंतराव शेलवटकर, मारुती काकडे, तुषार मर्दाने, अनिकेत चंदनबटवे, सोनू बहादे, मोबिन पठाण, ओम राऊत, तुषार तुरारे, प्रणय खेरे, हर्षल नन्नावरे, वनवैभव मेश्राम, स्वरानंदवनाचे दिव्यांग कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांची लक्षणीय उपस्थिती होती.
*टायगर ग्रूपतर्फे रुग्णालयात फळ वाटप*
टायगर ग्रूपचे संस्थापक जालिंदर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा टीमतर्फे उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र मर्दाने व पहेलवान तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सुराणा, वरोरा टायगर ग्रूपचे पदाधिकारी रिषभ रट्टे, बाळा चांभारे, मारोती नामे, प्रीतम ठाकरे, ओम कार्लेकर, रोशन कुळसंगे, मंगेश आदींसह टायगर ग्रूपचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.