सा.भगवे वादळच्या प्रथम वर्धापनदिनी पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन प्राप्त झालेला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार गुरुनाथ तिरपणकर यांना मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान
लोकदर्शन मुबई 👉-गुरुनाथ तिरपणकर)-*
- ———————————————————— मुंबई-समाजात परखडपणे लेखणी द्वारे विचार मांडणारे धारावी,मुंबई येथील सा. भगवे वादळ या वर्तमानपत्राचा प्रथम वर्धापनदिन नुकताच धारावी येथील गणेश विद्यांमदीर हायस्कूल येथील प्रागंणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन सा.भगवे वादळ चे संपादक दत्ता खंदारे यांनी जनजागृती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांची भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कारासाठी निवड केली.त्या अनुषंगाने सा. भगवे वादळ या वर्तमानपत्राच्या प्रथम वर्धापनदिनी हा पुरस्कार मुंबई चौफेर चे संपादक प्रफुल्ल फडके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गुरुनाथ तिरपणकर हे सिटीझन वेलफेअर असोशिएशन,बदलापूर,कोष्टी व्हीजन ट्रस्ट महाराष्ट्र,अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेच(कोकण-मुंबई विभाग),रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळ,ग्लोबल मालवणी संस्था,रेल्वे प्रवासी संघटना बदलापूर,ठाणे जिल्हा वृत्त पत्रलेखक संघ,पत्रकार उत्कर्ष समिती,महाराष्ट्र राज्य मराठी मुक्त पत्रकार संघ,अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ,प्रेरणा फाऊंडेशन अशा संस्थांनवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.सा.भगवे वादळच्या प्रथम वर्धापनदिनाला कामगार नेते दै.मुंबई मित्र,वृत्त पत्र समुह संपादक अभिजित राणे,दै.मुंबई चौफेर चे संपादक प्रफुल्ल फडके,माजी महापौर स्नेहल आंबेकर,अ.भा.म.सा.प.कोकण प्रदेश अध्यक्ष अ.ना.रसनकुटे,माजी आमदार बाबुराव माने,होम फाऊंडेशनचे डाॅ.प्रविण निचत,समाजसेवक राजेश खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांचे सा.भगवे वादळ चे संपादक दत्ता खंदारे यांनी पुष गुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.गुरुनाथ तिरपणकर यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.