ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा तर्फे घंटागाडी व कचराकुंडीचे लोकार्पण उत्साहात संपन्न.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 7.नोव्हेंबर 2022 .. . उरण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा तर्फे जनतेच्या कल्याणासाठी नेहमी विविध योजना, प्रकल्प, विविध उपक्रम राबविले जातात. ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडाच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विकासकामे करण्यात आले असून ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा हद्दीतील 15 व्या वित्त आयोग निधीमधून घंटागाडी व कचराकुंडी बसविणे कामाचे लोकार्पण सोमवार दि 7/11/2022 रोजी सकाळी 11:30 वा. ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा खोपटे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

ग्रामपंचायतचे सरपंच विशाखा ठाकूर, उपसरपंच सुजित म्हात्रे, सदस्य भावना पाटील, राजश्री पाटील, देवानंद पाटील, शुभांगी ठाकूर, रितेश ठाकूर, अच्युत ठाकूर, मीनाक्षी म्हात्रे, करिष्मा म्हात्रे, संदेश म्हात्रे, जागृती घरत, ग्रामविकास अधिकारी रुपम गावंड,ग्रामसुधारणा मंडळाचे उपाध्यक्ष कमलाकर म्हात्रे, सचिव कुमार ठाकूर, बांधपाडा अध्यक्ष प्रकाश ठाकूर, म्हात्रे पाडा अध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, देऊळपाडा अध्यक्ष लक्ष्मण घरत, तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद ठाकूर, पाणी कमिटी सभापती महेंद्र पाटील, पाणी कमिटी सचिव विष्णू पाटील, शाळा व्यवस्थापन कमिटी सभापती कृष्णा ठाकूर,केंद्रप्रमुख के. पी. म्हात्रे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

घंटागाडी व कचरा कुंडी बसविणे कामाचे लोकार्पण झाल्याने ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा- खोपटे गाव स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होणार आहे. शिवाय नागरिकांचे आरोग्यही निरोगी,उत्तम राहणार असल्याने ग्रामस्थांनी ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडयाचे सरपंच, उपसरपंचासह सर्व सदस्यांच्या कार्याचे कौतुक करत सर्वांचे आभार मानले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसिद्ध निवेदक सुनिल वर्तक यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here