लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर, दि. 7 : वरोरा तालुक्यातील माढेळी येथे स्व. ताराचंद हिकरे यांच्या नावाने बांधण्यात येणा-या सामाजिक सभागृहाच्या बांधकामाबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज आढावा बैठक घेतली.
वरोरा येथील विश्रामगृहात झालेल्या या बैठकीला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर डॉक्टर गायकवाड,बाबा भागडे भाजपा जेष्ठ नेते, भाजपा तालुका अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे,शहर अध्यक्ष सुरेश महाजन,माजी नगराध्यक्ष वरोरा अहितेशाम अली, ओम मांडवकर,रोहिणी देवतळे,संतोष पवार,बाळू भोयर,करण देवतळे,अमित चवले,देव महाजन,अनिल साखरिया,तहसीलदार रोशन मकवाने, सा.बा.कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, वरोराचे उपअभियंता संजोग मेंढे व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, स्व. ताराचंद हिकरे यांच्या नावाने तयार होणारे सामाजिक सभागृह एकदम सुसज्ज व्हायला हवे. या सभागृहात नागरिकांचे छोटे मोठे कार्यक्रम होण्यासाठी किचन शेड, स्वतंत्र प्रसाधनगृहे आदींची व्यवस्था असावी. तसेच संरक्षण भिंत, परिसराचे सौंदर्यीकरण, पेवर ब्लॉक, सौरउर्जेची व्यवस्था आदी बाबींचे काम दर्जेदार व्हायला हवे. या सामाजिक सभागृहाच्या परिसरात स्व. ताराचंद हिकरे यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. पुतळा आणि सभागृहाचे नाव व इतरही बाबी आकर्षक होण्यासाठी सा.बा. विभागाने विशेष लक्ष द्यावे.
सभागृहाच्या कामाचे अंदाजपत्रक (1.27 कोटी रुपये) त्वरीत पाठवा. लवकरात लवकर मंजूरी मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे. मंजूरी मिळाल्याबरोबर सामाजिक सभागृहाचे काम जलदगतीने करा, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
००००००००