लोकदर्शन 👉 मोहन भारती
गोंडपिपरी :- गोंडपिपरी तालुक्यातील मौजा धाबा येथील जूने बेघर कडे जाणाऱ्या पोच मार्गाचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांचे शुभहस्ते पार पडले. रस्त्याने ये जा करताना स्थानिक शेतकरी, शेतमजूर, शालेय विद्यार्थी, रुग्ण यासह सर्व सामान्य नागरिकांची होणारी अडचण काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार सुभाष धोटे यांच्या लक्षात आणून देत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी केली. याची दखल घेऊन आ. धोटे यांनी जिल्हा खनिज निधी अंतर्गत ५७ लक्ष रुपये निधी मंजूर केला. आज या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी गोजोली मक्ता येथील दर्ग्याला संरक्षण भिंत व बोरवेल मंजूर करण्याबाबत सरपंच गिरीधर कोटनाके यांनी उपस्थित कार्यकर्ते व गावकऱ्यांसह आमदार सुभाष धोटे यांना निवेदन दिले.
या प्रसंगी गोंडपिपरी काँग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष बंडावार, धाबा चे माजी सरपंच नामदेव सांगडे, पोडसाचे सरपंच देविदास सातपुते, कृ.उ.बा.स माजी उपसभापती अशोक रेचनकर, नगरसेवक राकेश पुण, काँग्रेसचे उपाध्यक्ष नितेश मेश्राम, उपअभियंता श्री. वैद्य, नितीन धानोरकर, बालाजी चणकापुरे, ग्रा प सदस्य जितेंद्र गोहणे, काँ. अ. जाती जमाती विभाग अध्यक्ष सचिन फुलझले, उपसरपंच साईनाथ कोडापे, सरपंच धिरेंद्र नागापुरे, अनिल कोरडे, सोनल झाडे, आनंदराव कोडापे, सरपंच गिरीधर कोटनाके, धाबा चे सरपंच वैशालीताई म्हशाखेत्री, उपसरपंच कवडूजी कुबडे, ग्रा प सदस्य राणीताई बंडावार, सचिन सिडाम, विद्याताई झाडे, अर्चनाताई झाडे, संगीताताई ना.सांगडे, राजू बोरकर, प्रकाश हिवरकर, शंकर येलमुले , दिलीप पुलगमकर, शामराव मुंजनकर, प्रकाश वाडगुरे, नारायण वाडगुरे, नितेश घ्यार, सुक्राम सोयाम, डॉ.साजन झाडे, अक्षय बिट्टीवार, पुंडलिक मेश्राम, राजू कोरडे, प्रकाश मडावी, देवराव भुरकुंडे, दशरथ भूरकुंडे यासह स्थानिक परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.