लोकदर्शन👉 मोहन भारती
गोंडपिपरी – चंद्रपूर महामार्गावार गोंडपिपरी पासून ६ किलोमीटर अंतरावर दोन दुचाकीस्वार समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामुळे क्षातीग्रस्त झाले. यामध्ये पवन राजु बामणे रा. कोठारी आणि श्रीकांत कृष्णकांत कृपाकर पोलीस कर्मचारी आष्टी अशी या दोन्ही दुचाकीस्वारांची नावे असून ते दुचाकी अपघातात जखमी होऊन पडले होते. या दरम्यान आमदार सुभाष धोटे हे धाबा येथे रस्ते विकासकामाचे भूमिपूजन करून दुसऱ्या कार्यक्रमाला याच मार्गाने जात असताना त्यांना हे दोन्ही दुचाकीस्वार अपघात क्षतिग्रस्त झालेले दिसले. काही स्थानिक नागरिक सुध्दा तेथे गोळा झाले होते. आमदार सुभाष धोटे यांनी आपली कार थांबवून स्वतः या अपघातग्रस्तांची चौकशी केली. आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने गोंडपिपरी आरोग्य विभाग व पोलीस विभागाशी संपर्क साधून तत्काळ मदत यंत्रणा बोलवून दोघांना दवाखान्यात भरती करण्याची व्यवस्था केली. गोंडपिपरी पोलिस निरीक्षकांना बोलावून या दोन्ही जखमींना तातडीने मदत पोहचविली. आमदार सुभाष धोटे यांच्या या संवेदनशील आणि माणूसकीच्या व्यवहाराने या दोन्ही अपघातग्रस्तांना तातडीने मदत व उपचार पोहोचली व मोठा अनर्थ टळला. तर आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी येथील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार व आपल्या कार्यकर्त्यांना सांगून या दोन्ही अपघातग्रस्तांकडे लक्ष देऊन आवश्यक मदत कार्य पोहोचविण्याच्या सुचना दिल्या आहेत.