लोकदर्शन बीड 👉 राहुल खरात
अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ आणि नाथ मुद्रा बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथील हॉटेल साईप्रसाद येथे नाथ संप्रदायातील नवनाथ यापैकी आद्य श्री मच्छिंद्रनाथ यांचे शिष्य श्री गोरक्षनाथ यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात रविवारी ठीक १०.३० वा. महासंघातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम श्री गोरक्षनाथ यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार घालून नारळ फोडून प्रसाद दाखवून करण्यात आले.नंतर नाथांचा डवर वाजवून आरती घेण्यात आली. सर्व नाथ बांधवांना प्रसादाचे वाटप करण्यात आले .
महासंघाच्या वतीने छोटीशी मीटिंग घेण्यात आली की या मीटिंगमध्ये श्री बालकनाथ यादव सर श्री संजय सावंत सर आणि श्री रंगनाथ पैठणकर यांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या संघाचे ध्येयधोरण यावर चर्चा करण्यात आली. संघाच्या वतीने सन 2023 चे कॅलेंडर छापण्याचे निश्चित झाले.
याप्रसंगी डॉ.के.बी.पैठणकर,प्रा. यादव सर ,श्री के सी चव्हाण सर, श्री संजय सावंत सर ,डॉ. शिवनाथ सुरवसे श्री रंगनाथ पैठणकर, श्री हरिभाऊ भराडी, श्री दत्ता शिराळकर, श्री धनराज जोगी(अंबड), श्री नागरगोजे, श्री जगन्नाथ निकम सर, श्री बबलु चव्हाण आदिनाथ जाधव मच्छिंद्र शिंदे सुनील धायडे राजू सुरोशे चौरंगीनाथ शेळके सुरज भराडी महासंघातील सर्व पदाधिकारी तसेच नाथ मुद्रा बचत गटातील सर्व सदस्य व बीड जिल्ह्यातील नाथवांधव आणि विशेषतः ता. अंबड जि. जालना येथून आलेले श्री धनराज जोगी आणि त्यांच्या समवेत आलेले काही नाथबांधव या प्रकट दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
नाष्टा आणि चहापाणी यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली