लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 6 .नोव्हेंबर २०२२ रायगडच्या राजकारणात अनेक अनेक नेते स्वतःला कार्यसम्राट समजतात पण रायगडला एक असा नेता लाभला की जो राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करत असतो तो नेता म्हणजे महेंद्र शेठ घरत. सतत समाजाची बांधिलकी जोपासून समाजामध्ये गोरगरिबांना, दुर्मिळ दुर्बल घटकातील आदिवासी बांधवांना, गरजूंना, विद्यार्थ्यांना ,कामगारांना न्याय देणार नेता म्हणजे महेंद्र शेठ घरत,निस्वार्थी काम करणारा हा रायगडचा देवदूत त्याचं उदाहरण म्हणजे 30 ते 35 वर्ष एक अगरबत्ती विक्रेता तो नित्य नियमाने अगरबत्ती व्यवसाय करायचा ते करत असताना अचानक त्याला लखवा मारला त्यामुळे त्याच्यावर खूप मोठ संकट आळ त्या संकटासाठी त्याने महेंद्र शेठ ना आवाज दिला लगेच महेंद्र शेठ यांनी निस्वार्थीपणांना त्या गरजूला आपला सुपुत्र कुणाल शेठ घरत यांच्या वाढदिवसानिमित्त एक स्टॉल उभारून दिला यातून गोर गरिबांना रोजगार देण्याचा प्रामाणिक कार्य महेंद्र शेठ घरत यांनी केल्याबद्दल त्यांच्या कार्याची पोच पावती या प्रसंगातून दिसून आली.त्यामुळे त्या परिवाराच्या वतीने घरत परिवाराचे आभार मानण्यात आले. या प्रामाणिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.