.!
लोकदर्शन मुंबई – दादर 👉राहुल खरात
नुकत्याच मुंबई शिवाजी मंदिर नाट्यगृहात गोवा राज्य कला व सांस्कृतिक संचालनालय आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज कला पुरस्कार प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यमहोत्सव पार पडला. या महोत्सवात गोव्याचे कला व सांस्कृतिक मंत्री श्री गोविंद गावडे, यावेळी त्यांनी नव्या पिढीने शिवरायांच्या चरित्राचा आवर्जून अभ्यास करावा असे मत व्यक्त केले. यावेळी सिने निर्माते दिग्दर्शक व अभिनेते विजय पाटकर, सिने अभिनेत्री अर्चना नेवरेकर, सिनेनिर्मात्या अमृता राव, सर्वोत्तम सातर्डेकर, सिध्दर्थ गायतोंडे, संस्थेचे अध्यक्ष किरण कुडाळकर व गोव्याचे नाट्यकर्मी भालचंद्र उसगावकर उपस्थित होते विमलानंद कला मंच संस्थेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा प्रयोग सादर केला तसेच दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र गोवा एकता सन्मान सोहळा पार पडला त्यात महाराष्ट्रातील तसेच गोव्यातील विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला त्याच गोव्यातील अविनाश अविनाश पुरखे, विनायक म नागवेकर, प्रसाद कुंडईकर, पुरुषोत्तम वसंत पै, भिकाजी बाबूसो म्हामाल, संदीप दयानंद फडते, अमोल दामोदर नाईक, उत्तम तिळू, मुरगावकर, पुंडलिक धुळापकर, श्याम नागवेकर यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील संदीप नारायण राक्षे अर्चना नेवरेकर, वरिष्ठ निरीक्षक पोलिस पुणे विनायक दौलतराव गायकवाड, रोहिणी निनावे मधुकर विष्णू तळवळकर, शरद बाजीराव भट, देवयानी मोहोळ व वकील मनीष माधव व्हटकर, यांच्या मान्यवरातर्फे सन्मान करण्यात आला. महाराजांची नाटके पाहणे आवश्यक असल्याचे सिनेअभिनेते विजय पाटकर म्हणाले, गोव्याच्या सुयोग कला मंच या संस्थेने शिवलिंगन नाटक सादर केले