शिवप्रेमी युवा प्रतिष्ठान तर्फे गड किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 5 नोव्हेंबर 2022शिवप्रेमी युवा प्रतिष्ठाण आयोजित दिपावली निमित्त गडकिल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेचे बक्षीस वितरण दि.04/11/2022 रोजी कार्तिकि एकादशी निमित्ताने श्री.विठ्ठल मंदिर धाकटे भोम येथे ठेवण्यात आले होते.सदर कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकुर, शिवधन पतपेढी चेअरमन गणेश म्हात्रे,माजी उपसरपंच श्रीधर पाटील,धाकटे भोम गाव ,उपाध्यक्ष जयवंत म्हात्रे,युवासेना उरण पूर्व उपविभाग युवाअधिकारी प्रशांत पाटील,शिवप्रेमी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कु.करण नारंगीकर,साईसेवक कु.रुपेश पाटील, तेजस ठाकीर चिरनेर ग्रा.पं.सदस्य धनेश ठाकुर ,माजी उपसरपंच अमर ठाकुर ,अनिल जोशी,शिवभक्त अलंकार ठाकुर ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.तसेच या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी कु.ओमकार महेश पाटील,द्वितिय क्रमांक कु.अंश अमर ठाकुर,तृतीय क्रमांक कु.स्मित नितिन म्हात्रे ,तर चतुर्थ क्रमांक दोन स्पर्धकांना देण्यात आले.कु.साईशा नितेश पाटील व माणस प्रविण मढवी तसेच स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच या पुढे या ही पेक्षा मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती शिवप्रेमी युवाप्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडुन सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here