लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि ४ नोव्हेंबर 2022आर्यन ग्रुप आँफ कंपनीचे डायरेक्टर समिर सुधाकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिघोडे गावातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर व श्री हनुमान मंदिरात शुक्रवारी ( दि४) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला होता.
आर्यन ग्रुप आँफ कंपनीचे डायरेक्टर तथा चिर्ले गावचे सुपुत्र समिर पाटील यांनी आपले वडील तथा चिर्ले गावचे माजी सरपंच सुधाकर उर्फ काका पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गोरं गरीबांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.तसेच उरण तालुक्यातील आदिवासी वाडीवर,ग्रामीण भागात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत.यावर्षी समिर पाटील यांचा वाढदिवस हा शुक्रवारी ( दि४) प्रबोधिनी एकादशी या दिवशी आल्याने आर्यन ग्रुप आँफ कंपनीच्या माध्यमातून गोरं गरीबांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिघोडे ग्रामपंचायत हद्दीतील श्री विठ्ठल रखुमाई व श्री हनुमान मंदिराच्या सभामंडपात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन दिघोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद रहिवाशांनी दर्शविला.या कार्यक्रमाचे औचित्य साधून सरपंच सोनिया महेंद्र घरत, माजी सरपंच किर्तीनिधी ठाकूर,अनंत म्हात्रे, निखिल पाटील, अलंकार पाटील, डॉ अलोप भटना, डॉ अश्रफ अली सह परिसरातील आजी माजी सरपंच उपसरपंच विविध पक्षांचे पदाधिकारी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यांनी समिर पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.