कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि. ४ नोव्हेंबर 2022 . . दि २/११/२०२२ रोजी समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष अतुल भगत यांच्या आदेशानुसार संघटनेचे सरचिटणीस दिपेश वास्कर व खजिनदार नैनेश म्हात्रे यांनी एम आय सी टी (MICT) कंपनी मध्ये जाउन तेथील व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. अजीत सिंग (Assitant Vice President), प्रद्युमन माळी (General manager ) यांच्यासोबत हि चर्चा झाली.

कंपनी व यूनियन अंतर्गत झालेल्या करारानुसार हाऊस किपींग कामगारांना सर्व सेवा सुविधा मिळाव्यात,लक्ष्मण ठाकूर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी रंजना लक्ष्मण ठाकूर यांना कामावर घेण्यात आले परंतू त्यांना मासिक पगार २७००० न देता १७००० एवढाच दिला जातो. तो वाढवून द्यावा. हिरा भगत व द्वारका भगत यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर बाकीच्या कामगारांना जेवढी कायदेशीर देणी देतात ते आमच्या सुद्धा कामगारांना मिळायलाच पाहीजे अशा एक ना अनेक मागण्यांबाबत चर्चा झाली. जर कामगारांच्या ह्या मागण्या मान्य झाल्या नाही तर कंपनी प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेने MICT कंपनी प्रशासनाला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here