पनवेल प्रवासी संघाच्या लाक्षणिक धरणे आंदोलनास माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा पाठींबा.

 

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 3 नोव्हेंबर 2022पनवेल बस डेपो मधील असुविधे बाबत जनता, प्रवाशी नाराज असून पनवेल बस डेपो मधील विविध समस्या त्वरित सुटाव्यात, प्रवाशांना, नागरिकांना योग्य व चांगल्या सुविधा मिळाव्यात या अनुषंगाने गुरुवार दि.3 नोव्हेंबर 2022 रोजी रोजी पनवेल बस डेपो समोर पनवेल प्रवासी संघ यांच्या तर्फे प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी जाहीर लाक्षणिक धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर आंदोलनास शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उपस्थिती लावून पाठींबा दिला आहे. यावेळी बस डेपोच्या मॅनेजरने 15 दिवसांनी मिटिंग घेऊन मागण्या मान्य करण्याचे आश्वासन पनवेल प्रवाशी संघाला दिले आहे.

यावेळी शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख (पनवेल) शिरीष घरत,पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप केसरीनाथ ठाकूर तसेच शिवसेनेचे पनवेल-उरण तालुक्यातील पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here