सुरेश पाटील यांची सामाजिक बांधिलकीतून कराडी समाज मंडळास देणगी.

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 3 नोव्हेंबर 2022कामगार नेते सुरेश कमळाकर पाटील (मु. जासई, तालुका उरण )यांनी कराडी समाज उरण तालुका (रजि. नंबर 77/2003 रायगड) या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेस 51000/- रुपये देणगी दिली. सुरेश पाटील हे अनेक सामाजिक ,शैक्षणिक संस्थांना मदत करीत असतात ते भारतीय मजदूर महासंघाच्या राष्ट्रीय महामंत्री पदावर कार्यरत असून ते कामगार क्षेत्रात एक धडाडीचे राष्ट्रीय नेते म्हणून उदयास येत आहेत.ते आपल्या अभ्यासपूर्ण व निस्वार्थी भावनेने कामगारांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.अनेक विविध सामाजिक उपक्रमांना नेहमीच त्यांचा हातभार असतो.त्यांच्या या दानशूर पणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.कराडी समाज मंडळ उरण या संस्थेस सामाजिक भावनेतून देणगी दिल्याबद्दल कराडी समाज मंडळ उरणच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुरेश पाटील यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here