- लोकदर्शन*सोलापूर 👉मोहन भारती दिनांक :-
- ०२/११/२०२२ :-* शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभाग निहाय बुथ यंत्रणा सक्षम करणे व पदाधिकारी नेमणुक प्रकिया संपर्कप्रमुख अनिल कोकीळ साहेब व जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे साहेब यांचा मार्गदर्शनाखाली आणि शहरप्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. यामध्ये शहरमध्य विधानसभा मतदार संघातील प्रभाग निहाय पदाधिकारी निवड व बुथ यंत्रणा कामकाज सुरू असून यासाठी शहरमध्य विधानसभा मतदार संघातील उपजिल्हाप्रमुख दत्तोपंत वानकर यांच्या सहकार्याने आणि सर्व उपशहरप्रमुखांच्या सह्योगाने पदाधिकारी निवड सिलसिला सुरू असल्याची माहिती शहरप्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रभाग निहाय संघटना बांधणी, बुथ यंत्रणा सक्षम आणि पदाधिकारी निवड याबाबत कामगार सेना कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत प्रभाग ९, १२, १३, १४, १५, १६, १७, १८ व १९ या प्रभागाचे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख व उपशाखाप्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना शहरप्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) म्हणाले की, प्रभाग पदाधिकारी सक्षम तर येणारी महानगरपालिका निवडणुका नक्कीच जिंकू फक्त यासाठी लोकांचे समस्या सोडविणे, प्रभागातील नागरिकांच्या संपर्कात राहणे, रस्ता, पाणी, ड्रेनेज या नागरीसुविधा पुरविण्यासाठी मदत करणे, वैद्यकिय मदत करणे हे काम अखंडीतपणे करा. व संघटनेशी निष्ठेने रहा. असे आव्हान केले. तर उपजिल्हाप्रमुख दत्तोपंत वानकर यांनी सर्व शिवसैनिकांशी संवाद सादून म्हणाले की, येणाऱ्या महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी आपल्या सर्वांचे सहभाग अत्यंत महत्वाचे आहे. म्हणजेच संघटनेच्या आदेशानुसार दिलेली जबाबदारी पुर्ण करावी. त्याचबरोबर प्रभागातील सर्व पदाधिकाऱ्यांसह लोकांच्या सर्व संकटांना मदत करावे. असे आव्हान केले.
सदर बैठकित उपशहरप्रमुख रेवण पुराणिक, संजय गवळी, धनराज जानकर , अनिल दंडगुळे, शुभम स्वामी, जंयत कदम, अनिल कोंडुर, अमित भोसले, सोमनाथ बंदपट्टे, बालाजी विठ्ठलकर, यांच्यासह विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. *●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆*
*फोटो मॅटर :- शहरमध्य विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी बैठकीत शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांसोबत शहरप्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज), उपजिल्हाप्रमुख दत्तोपंत वानकर दिसत आहेत.*