लोकदर्शन 👉नितेश केराम
कोरपना /
चंद्रपूर /कोरपना सन 2022/23 वर्षात खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली त्या मध्ये मोठा घोळ असून जिल्ह्यातील 1367 गावातील खरीप पिकाची पैसेवारी 50% पेक्षा जास्त दाखवण्यात आली आहे तर राजुरा उपविभागातील राजुरा कोरपना जिवती गोंडपिपरी या तालुक्यातील 396 गावे 50 पैस्या पेक्षा अधिक पैसेवारी दाखवली आहे मात्र प्रत्येक अस्तीत्वात असलेली ब्रिटी श कालीन आनेवारी पद्धत चुकीची असून कृषी विभाग महसूल विभाग व ग्रामपंचायत पातळीची आनेवारी समिती प्लांट पाहुण प्रत्येक्ष उत्पादनाचे मुल्यांक न करून अहवाल देत नाही मागच्या पद्धतीचा अवलंब करून कार्यलयात बसूनच आकडे जुळ वा जुळव करण्याची व शासनाला अहवाल देण्याची पद्धत चालविल्या जाते यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे जुलै आगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसाने महसूल अधिकाऱ्यांच्या चुकीच्या पद्धतीने पंचनामे कडून नाल्याच्या व नदीच्या काठावरील अनेकांच्या जमिनी खरवडून गेल्या पिक उध्वस्त झाली अशांना नाममात्र नुकसानीचे क्षेत्र दाखवण्यात आली व ज्याजमीनीचे पिकाचे नुकसान झाले नाही अशा ठिकाणी नुकसानीचे क्षेत्र वाढ दाखवीण्यात आली