लोकदर्शन 👉.राहुल खरात
पुणे(सत्यशोधक रघुनाथ ढोक)
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्य संपुर्ण भारत वर्षात नेणार्या व छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी जनमाणसातील सामाजिक समता टिकविण्यासाठी, आणि अन्यायाच्या विरोधात संविधानिक पध्दतीने संघर्ष करणार्या या समता परिषदेला 30 वर्ष आज 1 नोव्हेंबर 2022 रोजी पूर्ण होत आहे.याचा आम्हा समता सैनिकांना नामदार छगन भुजबळ साहेब यांचा सार्थ अभिमान वाटत आहे.
या संघटनेच्या स्थापनेनंतर संघटनेची यशस्वी वाटचाल पुढील प्रमाणे थोडक्यात सा येईल : १.नोव्हेंबर १९९२ ला संघटन स्थापन झाले त्याच्यानंतर भुजबळ साहेब यांनी मंडल आयोग लागू केला आणि बहुजन समाजासाठी राजकारणामध्ये दार खुले करून दिली. आज सरपंच , झेडपी सदस्य व इतर संस्थेमध्ये आज जे ओबीसी इतर मागास वर्गीय यांना *ग्रामपंचायत ते आमदारकी पर्यंत जे लोक पद भूषवत आहेत* ती बाबा साहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातील कलम ३४० नुसार मंडल आयोग व सर्व ओबीसी नेते व भुजबळ साहेबांच्या प्रयत्नांची देणं आहे, हा आयोग लागू नसता तर आज बहुजन समाजातील लोक कुठल्याच पदावर गेले नसते संघटनेच्या प्रयत्नामुळे व भुजबळ साहेबांनी मंडल आयोगाची मागणी करून सर्वसामान्यांना राजकारणामध्ये घडवायचं काम केले हे संघटनेचे यश आहे. व मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देणे असो किंवा पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचे नाव देण्याचे कार्य असो. अनेक ठिकाणी महापुरर्षांचे पुतळे बसविण्यासाठी समता परिषदेचे मोठे योगदान आहे तसेच पुणे येथील समता भूमी राष्ट्रीय स्मारक व नायगाव येथील सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक होणे कामी देखील या परिषदेचे मोठे योगदान असून याचे सर्व श्रेय नामदार छगन भुजबळ साहेब यांनाच जाते.हे सघटन महाराष्ट्राचे पुरते मर्यादित न रहाता इतर राज्यांमध्ये हे संघटन खूप प्रमाणामध्ये उभा करण्यात भुजबळ साहेबांना यश आले .जगामध्ये सर्वात मोठे ओबीसी चे नेते म्हणून भुजबळ साहेबांची ओळख आहे, ती या मुळेच. आज वीस-पंचवीस लाखांचे मेळावे फक्त भुजबळ साहेब बाहेरच्या राज्यात जाऊन घेऊ शकतात.आणि संघटनेने गेल्या 30 वर्षांमध्ये भरपूर छोटी-मोठी कामे करीत सद्या महात्मा फुले यांच्या सत्यशोधक कार्यावर जोर देऊन सर्व समाजात मोठी चळवळ उभी करून सत्यशोधक रघुनाथ ढोक सारखे समता सैनिक तयार करून सत्यशोधक विवाह चळवळ व इतर कार्य महाराष्ट्र पुरते मर्यादित न ठेवता त्यांनी तेलगणा राज्यात अनेक सत्यशोधक विवाह मोफत लावून या व अशा अनेक प्रकारचे सामाजिक कामे मोठ्या प्रमाणामध्ये परिषदेच्या माध्यमातून केलेले आहे व समता सैनिक हे काम पुढे पण करत राहतीलच. या निमित्ताने समता परिषदेच्या 30 व्यां
वर्धापन दिनी सर्व समता सैनिकांना हार्दिक शुभेच्छा. सत्य की जय हो.