लोकदर्शन*सोलापूर 👉मोहन भारती .
दिनांक :- ०१/११/२०२२ :-* जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची लाचखोर प्रकरणी संपती सिल करून C.B.I. मार्फत सखोल चौकशी करा. अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने मा. जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. अशी माहिती शहरप्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
सोलापूर शिवसेनेच्या वतीने संपर्कप्रमुख श्री अनिल कोकीळ साहेब व जिल्हाप्रमुख श्री पुरुषोत्तम बर्डे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना शहर प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज )यांच्या नेतृत्वाखाली मा. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात शिक्षण क्षेत्रालाच काळीमा फासलेला लाचखोर प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या विरोधात मा. जिल्हाधिकारी यांना शहरप्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार हे एका शिक्षण संस्थेकडुन २५०००/- (पंचवीस हजार रुपये) लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांकडुन रंगे हात पकडले गेले. शिक्षणाधिकारी किरण लोहार हे वादग्रस्त व्यक्ती असुन गेल्या अनेक वर्षापासुन त्यांच्या सर्व्हिस काळात अनेक वेळा त्यांच्या विरूध्द वेगवेगळ्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांनी अशाच लाच घेऊन मोठी माया (पैसे) जमविलेली आहे. त्यामुळे त्यांच्यासह संपुर्ण कुटुंबाची आर्थिक चौकशी व्हावी. अशी मागणी आहे. शिक्षण सारख्या पवित्र क्षेत्रात लाच घेणारा व्यक्ती म्हणुन किरण लोहार यांची यापुर्वी ही अनेक तक्रारी शिक्षण खात्याकडे आल्याचे समजते. म्हणुन किरण लोहार यांनी यापुर्वी मंजुरी दिलेल्या सर्व प्रकरणाची फेरतपासणी करावी. एकुनच अशा लाचखोर अधिकाऱ्यांची खाते निहाय चौकशी होऊन त्यांना कठोरातील कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सोलापुर शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे.
तरी माननीयांनी सोलापुरचे जिल्हाधिकारी या नात्याने वरील विषयी गंभीरतेने लक्ष देऊन किरण लोहार व त्यांचे सर्व कुटुंबिय व जवळचे मित्र परिवार या सर्वांची आर्थिक व्यवहाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी. ही विनंती. असे नमुद करण्यात आले.
*सदर निवेदनाची प्रत माहितीत्सव मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. पालकमंत्री, सोलापूर जिल्हा यांना पाठविण्यात आले आहे.*
शिवसेना शहरप्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, अमर पाटील, उपशहरप्रमुख संताजी भोळे, विजय पुकाळे, अमित भोसले, गणेश म्हंता, गुरुनाथ कोळी, पप्पु शेख, अभिषेक चिलका, विठ्ठल कुऱ्हाडकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. *●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆*
*फोटो मॅटर :- भ्रष्ट शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची संपती जप्त करून यांची C.B.I. चौकशी करावे. अशी मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने मा. निवासी जिल्हाधिकारी शमा पवार मॅडम यांना देण्यात आले. सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी (महाराज), प्रताप चव्हाण, संताजी भोळे, विजय पुकाळे आदि शिवसैनिक दिसत आहेत.*